एक्स्प्लोर

BIG BOSS MARATHI 2 | अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची कारवाई

अभिजीत बिचुकले हा 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे.

मुंबई : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी अभिजीत बिचुकलेला सेटवरुन त्याला अटक केली. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजेच अटकेच्या वेळी बिचुकलेने कोणताही विरोध केला नाही. चेक बाऊन्स प्रकरणात सातारा कोर्टाने बिचुकलेविरोधात वॉरंट जारी केलं आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत दाखल झाले. बिग बॉस मराठीचा सेट मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनी अटकेच्या कारवाईसाठी मुंबई पोलिसांची मदत मागितली होती. अटक केल्यानंतर बिचुकलेला उद्या सातारा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकले स्पर्धेत कायम राहणार की इथेच त्याचा घरातील प्रवास संपणार, तसंच यावर कलर्स मराठी वाहिनी काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दरम्यान, अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या 24 व्या भागात हा प्रकार घडला होता. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेला शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी  केली होती. अभिजीत बिचुकले हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत असतो, आता या नव्या वादाची त्यात भर पडली आहे. कोण आहे अभिजीत बिचुकले? - साताऱ्यातच मागासवर्गीय घरात बिचुकलेचा जन्म झाला - घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा  परंपरागत व्यवसाय - बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होता - पण सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला - त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन - त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी जाहीर करणे - आणि त्यानंतर ऐनवेळी माघार घेणे हे प्रकार सुरु केले - उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली - पण कधीही 2 हजार मतांच्या वर त्याची मजल गेली नाही - यंदा त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता - इतकंच काय त्यानं आपल्या पत्नीलाही निवडणुकीत उभं केलं - अभिजीत बिचुकलेवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत संबंधित बातम्या 'बिग बॉस'च्या शाळेत इव्हेंच्युअली बिचुकले गुरुजी देणार इंग्रजीचे धडे मी फक्त एकालाच घाबरतो, अभिजीत बिचुकलेला : उदयनराजे भोसले बिचुकलेंना 'बिग बॉस'मधून बाहेर काढा, भाजपच्या माजी नगरसेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीला Big Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात बिचुकले का बिथरले?

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget