मुंबई : हिंदी मालिकांमध्ये भूमिका करणारा बालकलाकार शिवलेख सिंह (Shivlekh Singh) याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. 14 वर्षांच्या शिवलेखला कार अपघातात प्राण गमवावे लागले, तर त्याचे आई-वडील यामध्ये जखमी झाले आहेत.
संकटमोचक हनुमान, ससुराल सिमर का यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये शिवलेख सिंहने भूमिका केल्या आहेत.
छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात शिवलेख आणि त्याच्या कुटुंबीयांना अपघात झाला. शिवलेख आपल्या कुटुंबासह रायपूरहून परत येत होता. त्यावेळी धरसीवा भागात त्याची गाडी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये शिवलेखचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात शिवलेखची लेखना सिंह, वडील शिवेंद्र सिंह आणि नवीन सिंह हा नातेवाईक जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघा जखमी आणि शिवलेखला पोलिसांनी रायपूरमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पोलिस पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.
'ससुराल सिमर का'फेम बालकलाकार शिवलेखचा कार अपघातात मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2019 11:31 AM (IST)
संकटमोचक हनुमान, ससुराल सिमर का यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केलेला बालकलाकार शिवलेख सिंह याचा छत्तीसगडमध्ये झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -