एका चेक बाऊन्सप्रकरणी 21 जून रोजी अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी मुंबईत मराठी बिग बॉसच्या सेटवरून अटक केली होती. त्यांनतर बिचुकलेला कलम 384 आणि 506 अंतर्गत खंडणीच्या एका जुन्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली, ज्याप्रकरणात तो अजूनही अटकेत आहे.
हा खटला सध्या अंतिम टप्यात असल्याने बिचुकलेविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याने लवकरच हा खटला निकाली निघण्याची शक्यता आहे, अशी महिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हायकोर्टात दिली. त्यामुळे हायकोर्टाने ही याचिका पहिल्याच सुनावणीत निकाली काढली.
पाहा अटकेनंतर अभिजीत बिचुकलेची पहिली प्रतिक्रिया | ABP Majha
बिचुकलेने यंदाची लोकसभा निवडणूकही लढवली होती. या काळात बिचुकलेला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणातील वॉरंट बजावले नाही, अथवा त्याला ताब्यातही घेतले नाही. इतकी वर्ष बिचुकले सातारा शहरातच होता. त्यामुळे आरोपी फरारी होता हे पोलिसांचे म्हणणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाने सत्र न्यायालयात केला होता.
पाहा काय म्हणतायत बिचुकलेचे चाहते
अभिजीत बिचुकले हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत होता, मात्र आता तो बिग बॉसच्या घरात पुन्हा दिसेल, याची शक्यता कमी आहे.
कोण आहे अभिजीत बिचुकले?
- साताऱ्यातच मागासवर्गीय घरात बिचुकलेचा जन्म झाला
- घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा परंपरागत व्यवसाय
- बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होता
- पण सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला
- त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन
- त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी जाहीर करणे
- आणि त्यानंतर ऐनवेळी माघार घेणे हे प्रकार सुरु केले
- उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली
- पण कधीही 2 हजार मतांच्या वर त्याची मजल गेली नाही
- यंदा त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता
- इतकंच काय त्यानं आपल्या पत्नीलाही निवडणुकीत उभं केलं
- अभिजीत बिचुकलेवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत
संबंधित बातम्या