Lagnachi Bedi : छोट्या पडद्यावरील वेगवेगळ्या विषयांवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. लवकरच लग्नाची बेडी (Lagnachi Bedi) ही मलिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता संकेत पाठक (sanket pathak) दोन वर्षांनंतर या मालिकेच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर पुनरामगन करतोय.


'लग्नाची बेडी’ मालेकत संकेत आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. देशावर मनापासून प्रेम करणारा आणि गुन्हेगारीचा खात्मा करण्यासाठी जीवाची बाजी लावायलाही मागेपुढे न पाहाणारा असा हा आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी. 


संकेतसाठी ही मालिका नवं आव्हान असणार आहे. लग्नाची बेडी या मालिकेतल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना संकेत म्हणाला, ‘राघव रत्नपारखी हा अतिशय प्रामाणिक आणि धाडसी आयपीएस ऑफिसर आहे. एकत्र कुटुंबात वाढलेला आणि नात्याचं महत्व जाणणारा. हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नव्या वर्षाची सुरुवात एका चांगल्या प्रोजेक्टने होतेय याचा आनंद आहे. खाकी वर्दीची ताकद आपल्या सर्वांनाच माहित आहे. ती परिधान केल्यानंतर अंगात एक वेगळीची ऊर्जा संचारते. हे पात्र साकारताना एक अभिनेता म्हणून नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाह सोबत जुनं नातं आहे. याधी दुहेरी आणि छत्रीवाली या मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे हे नवं पात्र आणि नवी मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नव्या वर्षात, नव्या सत्रातली ही नवी मालिका लग्नाची बेडी  31 जानेवारीपासून दुपारी 1 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!


Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम


Nakuul Mehta : अभिनेता नकुल मेहतानंतर त्याच्या 11 महिन्यांच्या मुलालादेखील कोरोनाची लागण


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह