Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात असतात. दीपिका लवकरच तिच्या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटांच्या सेटवर धमाल मस्ती करतानाचे व्हिडीओ आणि फोटो दीपिका सोशल मीडियावर शेअर करते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपिकाने सांगितलं की चित्रपटाच्या सेटवर जाताना सोबत रंगित पेन्सिल बॉक्स घेऊन जाते. त्याचं कारणंही तिने सांगितले आहे. 

Continues below advertisement

'या' कारणामुळे दीपिका रंगीत पेन्सिलचा बॉक्स सेटवर घेऊन जातेनुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपिकाने सांगितले की, ती चित्रपटाच्या शूटिंगला जाताना सोबत रंगीत पेन्सिलचा बॉक्स घेऊन जाते. या पेन्सिल्सचा वापर ची स्क्रिप्ट वाचताना डायलॉग्स हायलाइट करण्यासाठी करते. तिची ही सवय दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी पाहिली होती.    

दीपिकाचे आगामी चित्रपटदीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'द इंटर्न' या आगामी चित्रपटामध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. दीपिकाने 83 चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल

Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम