Sa Re Ga Ma Pa Little Champs : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. त्यामुळे नव्या पर्वाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


महाराष्ट्रातील नव्या दमाच्या गायकांना ओळख देण्याचं खरं काम  ‘सारेगमप’ या कार्यक्रमाने केलं आहे. आजवर या कार्यक्रमाचे 15 पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘सारेगमप’  या कार्यक्रमाने अनेक उत्तमोत्तम गायक आणि गायिका महाराष्ट्राला आणि सिनेसृष्टीला दिले आहेत.


मराठी संगीत क्षेत्रात ‘सा रे ग म प’ चं नाव नेहेमीच आदराने घेतलं गेलं आहे. ‘सा रे ग म प’ च्या प्रवासात अनेक पर्व झाली त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो “सा रे ग म प लिटिल चॅम्प्स”चा हे पर्व तुफान गाजलं ते म्हणजे ‘पल्लवी जोशी’ च्या खुमासदार सूत्रसंचालनाने आणि रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नांमुळे. यंदाचं हे पर्व जरा वेगळे असणार आहे. संगीत कार्यक्रमातून हरवत चाललेल्या खरेपणा प्रेक्षकांसमोर पुन्हा आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. 






'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'चं यंदाचं पर्व खास


आजपर्यंत स्पर्धक ऑडिशनला येतात पण यावेळी सारेगमपचे परिक्षक अखंड महाराष्ट्रातून प्रेक्षकांना भावणारे सूर शोधून आणणार आहेत आणि ही जबाबदारी सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) आणि वैशाली माडे (Vaishali made) यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. सलील कुलकर्णी यांनी याआधी सारेगमपचे परीक्षक म्हणून काम केले आहे पण सारेगमपची विजेती महागायिका वैशाली पहिल्यांदाच परीक्षण करणार आहे. या पर्वाची आणखी एक खासियत म्हणजे ह्यावर्षी सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत बघायला मिळणार आहेत.त्यामुळे यंदाचं हे पर्व नाही तर प्रेक्षकांना सांगीतिक पर्वणी मिळेल यात शंका नाही .


'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'कधी होणार सुरू? 9 ऑगस्ट
कुठे पाहता येणार? झी मराठीवर 
किती वाजता? बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता


संबंधित बातम्या


Kartiki Gaikwad : 'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाडबद्दल जाणून घ्या...