Vanita Kharat And Gaurav More:  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधील कलाकार हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत जाऊन हे कलाकार तिथल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नुकताच अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) आणि अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) यांनी अमेरिकेतील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे डान्स करताना दिसत आहेत. 


वनिता खरात आणि गौरव मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते दोघे न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 'छोटे मियां बडे मियां' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. वनिता आणि गौरव यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 


वनिता खरात आणि गौरव मोरे यांच्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'गौरव भाई, वनिता तुझ्यासोबत आहे तुला आजिबात घाबरण्याची गरज नाही' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'खूप छान डान्स'






बोस्टनमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम झाल्यानंतर गौरव मोरेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन प्रेक्षकांचे आभार मानले होते. तसेच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ शेअर करुन गौरवनं कॅप्शनमध्ये लिहिलं,  'हम लोग अमेरिका में मचारेले भाई,खतरनाक प्रेम आहे,प्रेक्षकांच खुप खुप आभार अमेरिका'






'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची टीम पोहोचली अमेरिकेला; समीर चौघुलेनं शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला, 'समाधान आणि आनंद'