Sa Re Ga Ma Pa L'il Champs : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa L'il Champs) हा लोकप्रिय कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या पर्वातील मराठमोळ्या मुलीने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे. 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमातील एका मराठमोळ्या मुलीच्या भन्नाट परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क केलं आहे. 


ज्ञानेश्वरी घाडगे (Dnyaneshwari Ghadge) असे या मुलीचे नाव आहे. 12 वर्षीय ज्ञानेश्वरीच्या गाण्याने सर्वच अवाक झाले आहेत. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे परीक्षक शंकर महादेवन आणि अनु मलिकदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत. त्यानंतर परीक्षक आणि कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या रसिकांनी उभं राहत ज्ञानेश्वरीसाठी टाळ्या वाजवल्या आहेत.






ज्ञानेश्वरी ही रिक्षा चालकाची मुलगी आहे. शालेय गणवेशातच ती लिटिल चॅम्प्सच्या ऑडिशनसाठी गेली होती. ज्ञानेश्वरी ही मूळची ठाण्याची आहे. तिच्या गाण्याने एकच जल्लोष झाला होता. सध्या ज्ञानेश्वरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी ज्ञानेश्वरीचे कौतुक करत आहेत. 


'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर ज्ञानेश्वरीने शास्त्रीय गाणं गायलं आहे. गाणं गायल्यानंतर ज्ञानेश्वरीला सुवर्णपदक देण्यात आले. सोशल मीडियावरही ज्ञानेश्वरीचं खूप कौतुक होत आहे. ज्ञानेश्वरी यंदाच्या पर्वाची विजेती होऊ शकते असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. शंकर महादेवन आणि अनु मलिक यांच्यासह नीती मोहनदेखील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या यंदाच्या पर्वाची परीक्षक आहे. 2 ऑगस्टपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता, नागपूर, लखनऊ, इंदौर, जयपूर आणि चंढीगढमध्ये या पर्वाच्या ऑडिशनला सुरुवात झाली आहे. झी टीव्हीवर प्रेक्षकांना आता हा कार्यक्रम पाहायला मिळत आहे. 


संंबंधित बातम्या : 


Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या घरामधून निखिल राजेशिर्के बाहेर! मांजरेकर म्हणाले...