Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम स्पर्धकांमुळे तसेच त्यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे. आता दोन आठवड्याच्या प्रवासानंतर 'बिग बॉस'च्या घरातून कोणता सदस्य बाहेर पडेल याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं असून निखिल राजेशिर्केला (Nikhil Rajeshirke) घराबाहेर जावं लागलं आहे. 


बिग बॉस या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आपण या घरात शेवटपर्यंत टिकून राहावं असं वाटतं. पण ते शक्य नसतं. दोन आठवड्याच्या प्रवासानंतर कोणता सदस्य घराबाहेर जाईल याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने अमृता धोंगडे, रोहित शिंदे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के हे डेंजर झोनमध्ये आले. पण यात निखिल राजेशिर्के याला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.


महेश मांजरेकरांनी घेतली स्पर्धकांची शाळा


बिग बॉस मराठीच्या चावडीवर काही सदस्यांची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. तर चावडीत यशश्री आणि रोहितला महेश मांजरेकरांकडून मिळाला शब्दांचा वार. तर या आठवड्यात ज्या सदस्यांनी गद्दारी केली त्यांना ठेचण्याची संधी घरातील सदस्यांना मिळाली. ज्यामध्ये यशश्रीने अमृताचे नावं घेतले तर मेघा घाडगे यांनी किरण माने यांचे नाव घेतले तर रोहित शिंदे याने अमृता धोंगडेचे नावं घेतले. 


महेश मांजरेकरांनी सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या. तसेच जे घरामध्ये वा टास्कमध्ये दिसत नाहीत त्यांनादेखील ते कुठे कमी पडत आहेत ते सांगितले. यासोबतच बिग बॉसच्या चावडीमध्ये फॅन्सला चुगली बूथद्वारे तेजस्विनीला अपूर्वाची चुगली आली तर विकासला समृद्धीची चुगली आली. 




बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना आता पुढच्या आठवड्यात कोण राहील? कोण जाईल? कोण होईल कॅप्टन? कोण होईल नॉमिनेट? कोण होईल सेफ? याची उत्सुकता लागली आहे. आठपासून पुन्हा नवा आठवडा सुरू झाला असून स्पर्धक आणखी विचारपूर्वक खेळतील, तसेच मांजरेकरांच्या सुचनांचे पालन करताना करताना दिसून येतील. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4: अमृता आणि तेजस्विनीमध्ये उडाले खटके; बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये काय होणार?