Rupali Ganguly Quit Anupamaa? रुपाली गांगुली स्टारर 'अनुपमा' ही भारतीय टेलिव्हिजन स्क्रीनवरील टॉप रेटेड शो आहे. 3 जानेवारी रोजी इंटरनेटवर अचानक हा शो चर्चेत आला. याचं कारण ठरलं, मालिकेचा घसरलेला टीआरपी आणि त्यानंतर मालिकेची लीड अॅक्ट्रेस रुपाली गांगुलीनं शो सोडल्याच्या चर्चा. सोशल मीडियावर रूपाली गांगुली राजन शाहीच्या शोमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. हे ऐकताच तिच्या चाहत्यांचा पुरता गोंधळ उडाला. प्रत्येकाला सर्व खरं की, खोटं याची चर्चा सुरू झाली. अशातच याबाबत आता निर्मात्यांनी खुलासा केला आहे. निर्मात्यांनी रुपाली गांगुली शो सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुपाली गांगुली 'अनुपमा' मालिकेतून बाहेर पडल्याची बातमी खरी नसल्याचं स्वतः निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. लेटेस्टली पोर्टलनं राजन शाहीच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'डायरेक्टर्स कुट प्रोडक्शन'बाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी रुपाली गांगुली अनुपमा मालिका सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. प्रॉडक्शन हाऊसने दावा केला की, अभिनेत्री शो सोडत असल्याच्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत.
रुपाली गांगुली मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण
शुक्रवारी टाईम्स नाऊनं दिलेल्या माहितीनुसार, रुपाली गांगुली 'अनुपमा' सीरिअल सोडणार आहे. 2020 मध्ये प्रीमियर झाल्यानंतर शोमध्ये लीड रोलसाठी रुपाली गांगुलीची निवड करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मेकर्सनी शोमध्ये 15 वर्षांचा लीप दाखवलं आहे. आता मालिकेचं कथानक अनुपमाची मुलगी राहीच्या अवतीभोवती फिरतेय. 'अनुपमा'मध्ये शिवम खजुरिया आणि अद्रिजा रॉय लीड रोल प्ले करताना दिसले.
रुपाली गांगुलीवर अभिनेत्यांचे गंभीर आरोप
अनुपमा यांच्याबाबत यापूर्वीही अनेक वाद निर्माण झाले आहेत. अनेकवेळा कलाकारांनी रुपाली गांगुलीला शो मध्येच सोडण्याचं कारण सांगितलं. काही कलाकारांनी सेटवर मुख्य अभिनेत्रीसोबत भांडण झाल्याची कबुलीही दिली होती.
'अनुपमा'चं रेटिंग खूप घसरलं
हा शो गेल्या काही काळापासून चर्चेत आहे, कारण त्यानं टीआरपी चार्टवरचं कित्येक दिवसांपासून असलेलं पहिलं स्थान गमावलं. अनुपमा हा टॉप रेटेड शो असायचा. तो टीआरपीमध्ये पहिल्या तीन क्रमांकापर्यंतही पोहोचू शकला नाही. ताज्या टीआरपी अहवालात, शोनं 2.3 रेटिंगसह चौथं स्थान मिळवलं आहे.