Rituraj Singh Death :  अभिनेते ऋतुराज सिंग यांचे मध्यरात्री कार्डिएक अरेस्टने मुंबईत निधन झाले. ऋतुराज सिंग (Rituraj Singh) यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. ऋतुराज सिंग यांनी 'अनुपमा' (Anupamaa) मालिकेतही भूमिका साकारली होती. 'अनुपमा' (Anupamaa) व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुलीनेही (Rupali Ganguly) शोक व्यक्त केला आहे. रुपा गांगुलीने (Rupali Ganguly) सोशल मीडियावर  (Social Media) पोस्ट लिहिली आहे. 


'अनुपमा' मालिकेत ऋतुराज सिंह यांनी अनुपमाच्या बॉसची व्यक्तीरेखा साकारली होती. रुपाली गांगुलीने 'अनुपमा'च्या सेटवरील ऋतुराज सिंहच्या शेफ गेटअपमधील एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोसोबत तिने एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. देखील केली. यामध्ये अभिनेत्रीने लिहिले, 'प्रिय ऋतुराज सर, तुमच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणे सन्मानाची गोष्ट होती. एखाद्या उत्साही विद्यार्थ्याला त्याचा आवडता विषय शिक्षकाकडून शिकायला मिळाल्यासारखेच हे होते. ज्याने यापूर्वी अनेकांना शिकवले आहे. तुम्ही म्हणाला होता की, तुम्ही माझे काम पाहिले आहेस आणि तरीही मला माझे काम तुमच्यासमोर सिद्ध करायचे होते. मी टीव्ही जगतातील एका दिग्गजाच्या शेजारी उभी राहून फ्रेममध्ये माझी जागा घेऊ शकले, अशा शब्दांत रुपा गांगुलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 






 


अभिनेता अर्शद  वारसीने व्यक्त केला शोक


अभिनेता अर्शद वारसीने ऋतुराज सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ऋतुराज सिंहच्या निधनावर  प्रचंड दु:ख झाले असल्याचे अर्शदने म्हटले. माझ्या पहिल्या चित्रपटाचे ते निर्माते होते. मी चांगला मित्र आणि कलाकार गमावला असल्याचे अर्शद वारसीने सांगितले. 


 






ऋतुराज सिंह यांचे कार्डिएक अरेस्टने निधन 


छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचे मध्यरात्री कार्डिएक अरेस्टच्या झटक्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या आकस्मिक निधनावर टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना तीव्र धक्का बसला आहे. 'अनुपमा' (Anupmaa) मालिकेत त्यांनी काम केले होते.