Shark Tank India 3:   'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. या दोन्हीही सीझन्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. शार्क टँक इंडिया या कार्यक्रमामध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक त्यांची बिझनेस आयडिया मांडतात. आता लवकरच शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात एका नव्या शार्कची म्हणजेच परीक्षकाची एन्ट्री झाली आहे. शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमामध्ये  Oyo Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल हे परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शार्क टँक इंडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. 


शार्क टँक इंडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमाचे परीक्षक दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं,  आमचे नवीन शार्क रितेश अग्रवाल, संस्थापक आणि सीईओ, OYO रूम्स यांचे शार्क टँक इंडियामध्ये स्वागत आहे. शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमाचे परीक्षण रितेश अग्रवाल, पीयूष बन्सल,अमन गुप्ता,विनीता सिंह  आणि अनुपम मित्तल हे करणार आहेत. 


नुकताच रितेश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमामधील सर्व शार्क्स म्हणजेच परीक्षण दिसत आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'जेव्हा मी माझा उद्योजकीय प्रवास सुरू केला तेव्हा संसाधने मिळणे कठीण होते. तथापि, इकोसिस्टमचा दयाळूपणा (मार्गदर्शक, कुलगुरू, इतर संस्थापक) यामुळे प्रवास थोडा सोपा आणि अधिक परिपूर्ण झाला.'


'शार्क टँक इंडियाने उद्योजकतेला घरा-घरामध्ये पोहोचवले. मी या कार्यक्रमाच्या सीझन 3 चा एक छोटासा भाग आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून  येणाऱ्या  उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी मी उत्साहित आहे.' असंही रितेश अग्रवाल यांनी पोस्टमध्ये लिहिलं.






शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षक   Sony LIV वर पाहू शकणार आहेत. नमिता थापर, अमित जैन हे देघील शार्क टँक इंडिया-3 या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Shark Tank India Season 3: नवनवीन बिझनेस आयडिया आणि शार्क्सच्या ऑफर्स; शार्क टँग इंडियाच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात!