Suraj Chavan in Bigg Boss Marathi season 5 : मनोरंजनाचा बॉस असलेल्या मराठी बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला धमाक्यात सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये कोण स्पर्धक म्हणून येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर यावरुन पडदा उठला आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये 16 स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे, यामध्ये अभिनेते, रिल स्टार, गायक आणि पुढारी यांची एन्ट्री झाली आहे. 


रिल स्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात


बिग बॉस मराठीच्या घरात रिल स्टार सूरज चव्हाणची एन्ट्री झाली आहे. गुलीगत धोका म्हणत टिकटॉक आणि रिल्सवर ज्याने धुमाकूळ घातला असा हा पठ्ठ्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्यांना गुलीगत चीत करायला पोहोचला आहे. आजपासून पुढील 100 दिवस स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.


गुलीगत धोका फेम मराठमोळा रिल स्टार सूरज चव्हाण






बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक कोण?


बिग बॉसच्या घरात रिल स्टार सूरज चव्हाण याच्यासोबत अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, पंढीरानाथ कांबळे उर्फ पॅडी, अभिजीत सावंत यांनी एन्ट्री घेतली आहे. दरम्यान एन्ट्रीच्या वेळी स्पर्धकांना दोन पर्याय देण्यात आले. बिग बॉसची करन्सी किंवा एक पावर कार्ड असा ऑप्शन देण्यात आलाय. त्यामध्ये अनेकांनी पॉवर कार्डची निवड केली तर काहींनी करन्सी घेतली. त्यामुळे आता खेळात चांगलीच रंगत येणार असल्याचं पाहायला मिळतंय.






खलनायिकेची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री


भाग्य दिले तू मला टीव्ही मालिका फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे. 
आता होणार कल्ला असं म्हणत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून जान्हवी किल्लेकरच्या नावाची चर्चा सुरु होती. आता ती स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे.





महत्त्वाच्या इतर बातम्या :


Paddy Kamble : मराठी मनोरंजनाचा राजा पॅडी बिग बॉस मराठीच्या घरात, हास्याचा फुलटॉस टाकणार की चक्रव्युहात अडकणार?