मुंबई : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) या शोमुळे चर्चेत आहे. रितेश देशमुख छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. रितेश देशमुख यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये होस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी या अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या शोचे चार सीझन होस्ट केले आहेत. आता या शोचा होस्ट अभिनेता रितेश देशमुख असणार आहे. आज बिग बॉस मराठी शोचा ग्रँड प्रीमियर रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियर आधी फॅमिलीसोबत रितेश कुटुंबासोबत वेल घालवताना दिसला.
ग्रँड प्रीमियर आधी फॅमिलीसोबत दिसला लाडका भाऊ
महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख याला नव्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. बिग बॉस मराठीच्या चक्रव्युहात कोणते स्पर्धक शिरणार आणि रितेश त्यांची कशाप्रकारे शाळा घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर पाहायला मिळणार असून त्याआधी रितेश रविवारी फॅमिली आऊंटींगला जाताना दिसला. रितेश देशमुख पत्नी जेनिलिया आणि मुलांसोबत लंच डेटला गेल्याचं समोर आलं आहे. यावेळीचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
आजपासून बिग बॉसच्या घरात रितेश घेणार स्पर्धकांची शाळा
रितेशची जेनेलिया आणि मुलांसोबत लंच डेट
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील पॉवर कपल्सपैकी एक आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांच्या केमिस्ट्रीने लोकांची मनं जिंकतात. ते अनेकदा आपल्या मुलांसोबत फिरताना आणि वेळ घालवताना दिसतात. आज पुन्हा एकदा हे कपल त्यांच्या मुलांसह लंच डेटवर गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ते मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाले. यावेळी देशमुख कुटुंबीय आपल्या स्टाईलने लोकांची मनं जिंकताना दिसलं.
रितेश देशमुखच्या मुलांनी पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं
रितेश देशमुख आणि त्याची मुले अनेकदा मीडियासमोर हात जोडून पोज देताना दिसतात. आता नुकतेच पुन्हा रेस्टॉरंटच्या बाहेर रितेश, जेनेलिया आणि त्यांची मुले मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर नमस्कार करत पोज देताना दिसले, याने सर्वांची मनं जिंकली आहेत. यावेळी, जेनेलिया केशरी रंगाच्या पोशाखात कॅज्युअल अंदाजा दिसली, तर रितेश देखील हिरव्या रंगाच्या टी-शर्टमध्ये छान दिसत होता. त्यांची मुलेही त्यांच्या साधेपणाने आणि संस्काराने सर्वांची मने जिंकताना दिसली. रितेश देशमुखच्या कुटुंबाचे हे फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरले आहेत.