एक्स्प्लोर

Rani Mi Honar : 'राणी मी होणार' मालिकेत उडणार लग्नाचा बार; मीरा होणार मल्हारची राणी

Rani Mi Honar : 'राणी मी होणार' मालिकेत लवकरच मीरा आणि मल्हार लग्नबंधनात अडकणार आहेत.

Rani Mi Honar : 'राणी मी होणार' (Rani Mi Honar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत लग्नाचा बार उडणार आहे. मीरा  आणि मल्हार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. मीरा मल्हारची राणी होणार आहे.

मीरा होणार मल्हारची राणी 

प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं. आपल्या स्वप्नातला राजकुमार.. लग्नं आणि सुखी संसाराचा सुंदर सारिपाट. सगळं कसं हवंहवंसं पण.. किती मुलींचं हे स्वप्नं पूर्ण झालंय बरं.. विषय विचार करायला लावणारा असला तरीही जर त्या स्वप्नातल्या राजकुमाराची जागा प्रत्यक्षातल्या एखाद्याने घेतली तर.. असा एखादा जो रोज आपल्यासोबत आहे अगदी सुख-दुःखाचा साथीदारच, ज्याला न सांगता आपल्या मनातलं उमगतं, जो आपल्या स्वप्नांसाठी कायम पाठीशी उभा राहतो. असाच एखादा.. दुसरा-तिसरा कुणी नाही तर आपला मल्हार असून मीराच्या स्वप्नांना उमेद देणारा मल्हारच खऱ्या अर्थाने मीराचा राजकुमार आहे. 'राणी मी होणार' मालिकेत लवकरच मीरा आणि मल्हारच्या लग्नाची लगबग पाहायला मिळणार आहे.

आपल्या आयुष्याचा जोडीदार श्रीमंत असावा या विचारांच्या मीराला मल्हारच्या तिच्यावरील प्रेमाची साधी कल्पना देखील नाही आहे. मैत्रीपलीकडे झुकेलेलं हे सुंदर नातं आता एका अशा बंधनात अडकणार आहे ज्याचा दोर अगदी त्यांच्या घट्ट मैत्रीइतकाच मजबूत असणार आहे. तुमच्या लक्षात आलं असणारच आहे ते म्हणजे मीरा आणि मल्हारची लगीनगाठ बांधली जाणार आहे. 

मीराला मल्हारच्या प्रेमाची जाणीव होईल का?

मल्हारला तर त्याची राणी भेटली आहे. पण मीराला मल्हारच्या प्रेमाची जाणीव होईल का?, मल्हार मीराला आपल्या प्रेमाची कबुली कशी देईल?, एक हक्काचा मित्र की आयुष्यभराचा जोडीदार यापैकी कुठल्या नात्यात मीरा मल्हारला स्विकारेल? की हा हक्काचा मित्रच आयुष्यभराचा जिवलग जोडीदार होईल?, लग्नानंतर या दोघांच्या घट्ट मैत्रीचं रूपांतर अतूट प्रेमात होईल का? हे आणि असे असंख्य प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडत असून याची उत्तरं मालिकेच्या पुढच्या भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

'राणी मी होणार' मालिकेबद्दल जाणून घ्या...

सुखी संसाराचं चित्र रेखाटण्यासाठी श्रीमंती फक्त आणि फक्त निर्व्याज प्रेमाची हवी हे सांगणारी 'राणी मी होणार' ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. पैसा आणि स्टेट्स यांच्या मायाजाळात अडकलेल्या पिढीला एक चांगला संदेश या मालिकेद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मीराचा राजकुमार आणि मल्हारच्या राणीची ही अनोखी प्रेम कहानी असणारी 'राणी मी होणार' ही मालिका आहे.

संबंधित बातम्या

Marathi Serials : 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'ठरलं तर मग' ठरली अव्वल; वाचा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cup Bashi Movie Movie Poster Launch: प्रेम, आदर अन् गोड रुसवे-फुगवे; सासू-सुनेच्या धम्माल केमिस्ट्री असलेली 'कप बशी', कधी रिलीज होणार?
प्रेम, आदर अन् गोड रुसवे-फुगवे; सासू-सुनेच्या धम्माल केमिस्ट्री असलेली 'कप बशी', कधी रिलीज होणार?
Zee Marathi New Serial: एकीच्या काळजात ज्वाला सुडाची, तर दुसरीच्या मनात ज्योत प्रेमाची; तुटलेल्या मनाला जोडू शकेल का ज्योत प्रेमाची? झी मराठीवर नवी मालिका
एकीच्या काळजात ज्वाला सुडाची, तर दुसरीच्या मनात ज्योत प्रेमाची; तुटलेल्या मनाला जोडू शकेल का ज्योत प्रेमाची? झी मराठीवर नवी मालिका
Ankita Walawalkar Work With Amir Khan: 'कोकण हार्टेड गर्ल'नं दिली गूड न्यूज; आमिर खानसोबत मोठ्या प्रोजेक्टसाठी करणार काम, पोस्ट करत म्हणाली...
'कोकण हार्टेड गर्ल'नं दिली गूड न्यूज; आमिर खानसोबत मोठ्या प्रोजेक्टसाठी करणार काम, पोस्ट करत म्हणाली...
Suraj Chavan: 'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?
'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?

व्हिडीओ

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
Rupali Chakankar : मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Ashok Kharat : रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार! 9 लाख कोटी पाण्यात, रिलायन्ससह दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले, कारणे काय?
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी पाण्यात
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
Video: दबावाची भीती, रात्रीचे 11 वाजता गुंडास्कॉड अशोक खरातच्या घरात घुसले, चोरनीतीचा वापर; आयुक्तांनी उलगडला थरार
Video: दबावाची भीती, रात्रीचे 11 वाजता गुंडास्कॉड अशोक खरातच्या घरात घुसले, चोरनीतीचा वापर; आयुक्तांनी उलगडला थरार
ह्रदयद्रावक... हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी
Embed widget