Ram Kapoor : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'बडे अच्छे लगते हो' ते 'कसम से' पर्यंतच्या टीव्ही मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. राम कपूरने केवळ टीव्ही इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. राम कपूर हा फक्त अभिनयासाठीच नाही तर त्याच्याजवळ असलेल्या वाहनांबद्दलच्या विशेष प्रेमामुळेही चर्चेत राहतो. नुकतीच राम कपूरने त्याची ड्रीम कार खरेदी केली आहे. राम कपूरला महागड्या कारमध्ये फिरायला आवडते. आणि त्याची ही आवड जपण्यासाठी तो प्रचंड मेहनतही करतो.   


नुकतीच राम कपूरने 3.50 कोटींची फेरारी कार (Ferrari Car) खरेदी केली आहे. फेरारीने अलीकडेच मॉडेल 3 लाँच केले आहे. त्यापैकी राम कपूरने फेरारी पोर्टोफिनो (Ferrari Portofino) खरेदी केली आहे. राम कपूरने त्याची ड्रीम कार खरेदी करण्यासाठी आधीच ही कार बुक केली होती. सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फेरारीच्या नवीन मॉडेलच्या बॅनरवर राम कपूर आणि कुटुंबाचे अभिनंदन लिहिलेले दिसत आहे. या फोटोत राम कपूर आणि त्याची पत्नी गाडीच्या सीटवर बसलेले दिसत आहेत.






राम कपूरची वाहनांबद्दलची ही ओढ यापूर्वी अनेकदा दिसली आहे. गेल्या वर्षी, राम कपूरने पोर्श 911 कॅरेरा खरेदी केली होती. या आलिशान कारची शोरूम किंमत 1 कोटी 85 लाख होती. या दोन कारसह, राम कपूरच्या ताफ्यात BMW X5 Mercedes Benz आणि SUV सारख्या इतर अनेक कारचाही समावेश आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; आवाज, नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण देण्याची मागणी


Car loan Information:

Calculate Car Loan EMI