Premachi Goshta Serial Update : प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेत लकी घरच्यांची फसवणूक करतोय, हे मुक्ता घरच्या सगळ्यांसमोर आणते. पण त्यावर इंद्रा तिच्यावर चांगलीच नाराज होते. त्यामुळे इंद्रा मुक्ताला आईपणावरुन टोचरे बोल सुनावते. लकी घरी सर्वांना तो चांगल्या मार्कांनी पास झाला असं सांगतो. पण तो नापास झालेला असतो, हे मुक्ताच्या लक्षात येतं. त्यानंतर मुक्ता हे सगळं घरच्यांसमोर आणण्याचं ठरवते. त्यातच लकीने घरच्यांची फसवणूक केल्याचं मक्ताने म्हटल्यामुळे इंद्रा तिच्यावर चांगलीच चिडते. 


दरम्यान लकीचं हे सत्य समजल्यावर सागर लकीला त्याच्या ऑफिसमध्ये येऊन पिऊनची नोकरी कर असं सांगतो. तुझी तिच लायकी आहे, असंही सागर यावेळी म्हणतो. सागर लकीवर चिडल्यामुळे घरातही बापू आणि इंद्राला धक्का बसतो. बापू सागरची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, पण सागर कोणाचंच ऐकत नाही. त्यातच या सगळ्याला इंद्रा मुक्ताला जबाबदार धरते. 


आईपणावरुन इंद्राचे मुक्ताला टोचरे बोल


दरम्यान इंद्रा मुक्ताला जबाबदार धरत तिला दुषणं देते. त्यावेळी इंद्रा मुक्ताला म्हणते की, तुझं समाधान, आता तुझं मन शांत झालं असेल. आता तुला बरं वाटलं असेल. तुझा आधीपासून लकीवर राग होता. यावर लकी खरंच चुकला असल्याचं मुक्ता इंद्राला म्हणते. त्यावर इंद्रा म्हणते की, तो जगासाठी चुकला असले, पण आई म्हणून मला किती त्रास होतोय, हे तुला नाही कळणार. माझा एक मुलगा दुसऱ्या मुलाची लायकी काढतोय. तू जर जन्म दिला असतास मुलाला तर तुला कळलं असतं की आईच्या वेदना काय आहेत ते. इंद्राच्या या बोलण्याने सागर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण इंद्रा तिचं काहीच ऐकून घेत नाही. 


इंद्रा देणार मुक्ताला शिक्षा 


दरम्यान हे सगळं झाल्यानंतर इंद्रा मुक्ताला चांगलीच शिक्षा देते. यापुढे घरात मी जे काही बनवेल तेच खायचं असं म्हणत इंद्रा मुक्तासमोर अंड बनवायला घेते. त्यामुळे मुक्ता घरातून डबा न घेता आणि काहीच न खाता बाहेर पडते. त्यामुळे सागर मुक्ताच्या क्लिनिकमध्ये तिच्यासाठी डबा घेऊन जातो. त्यातच सावनीला सागर आणि इंद्रा घरातलं काम करायला सांगतात त्यामुळे तिचाही राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. 


ही बातमी वाचा : 


Srikanth Official Trailer : 'श्रीकांत'चा धमाकेदार ट्रेलर, राजकुमार रावचा पॉवरपॅक परफॉर्मन्स; दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर करणार भाष्य