Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट'(Premachi Goshta) मालिकेत आज काही नाट्यमय घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. माधवीचा अपघात झाल्याने मुक्ता-सागरसह सगळेच चिंतेत पडतात. आईला बेशुद्ध अवस्थेत पाहून मुक्ता कावरीबावरी होते. तिला धक्काच बसतो. तर, कार्तिक सावनीच्या घरी असल्याचे समजताच स्वाती त्याच्यावर चिडते. आजच्या एपिसोडमध्ये काय पाहणार?
माधवीचा होणार गंभीर अपघात...
बाजारात खरेदीसाठी गेलेल्य माधवीला कार धडक मारून जाते. या धडकेने माधवीला गंभीर दुखापत होते आणि बेशुद्ध पडते. सुदैवाने त्याच ठिकाणी सागर असतो. तो माधवीला घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. त्याच दरम्यान, मुक्ताच्या मोबाईलवर सागरचे मिस कॉल आलेले असतात. मुक्ता सागरला फोन करते. तेव्हा आईच्या अपघातातबाबत कळते. आईच्या अपघातामुळे मुक्ताची चिंता वाढते. सागर तिला धीर देतो. माधवीला घरी आणल्यानंतर तिला पाहण्यासाठी मुक्ता पोहचते. त्यावेळी तिथे पुरू, सागर, मिहिका, मिहिर सगळे आलेले असतात. मुक्ताही आईला बेशुद्ध पाहून कावरीबावरी होते. त्यावर सगळे तिला धीर देतात.
कार्तिक करणार स्वातीला फोन
कार्तिक स्वातीला फोन करतो. त्यावेळी कार्तिक सावनीच्या घरी थांबला असल्याचे समजते. त्यावरून स्वाती त्याच्यावर चिडते. सावनी हे आपल्या घराच्या मुळावर उठली असताना तिच्या घरी काय करतोय असा प्रश्न स्वाती करते. त्यावर कार्तिक स्वातीची समजूत घालत मी तिच्या कोणत्याही प्लानमध्ये नाही असे सांगतो. मी तुला लगेच भेटायला येतो असे कार्तिक सांगतो. त्यावर स्वाती त्याला जिथे तुझा अपमान झाला, त्या घरात तू आलेलं मला आवडणार नाही. मीच काही तरी कारण काढून बाळासह तुला भेटायला येईल असे स्वाती त्याला सांगते.
कोळी कुटुंबाच्या घरी कार्तिक धडकणार
कार्तिक अचानकपणे कोळी कुटुंबाच्या घरी पोहचतो. त्याला दारात पाहून बापू चिडतात. कार्तिकही घरी आल्याचे पाहून सागरही संतापतो. आमचा तुमचा काहीही संबंध नाही असे बापू कार्तिकला सांगतात. कार्तिक काहीच ऐकत नसल्याने बापू सागरला घरी बोलावतात. सागर घरी आल्यावर धक्के मारतो आणि घरी पुन्हा येऊ नको असे सांगतो. त्याच वेळी स्वाती हॉलमध्ये येते. स्वाती कार्तिकवर चिडते आणि तुमच्यासारख्या नालायक माणसाचे तोंडही पाहायचे नाही असे सांगते. माझ्याशी आणि माझ्या मुलीशी काहीही संबंध नाही असे स्वाती कार्तिकला ठणकावते.
माधवीला अपघात करणाऱ्यावर कारवाई करणार?
घरातून पुन्हा गोखलेंच्या घरी आलेल्या सागरला घरी काही झाले विचारते. त्यावर सागर कार्तिक आला होता असे सांगतो. घरी काय घडलं याची माहिती सागर मुक्ताला देतो. कार्तिक तुरुंगाच्या बाहेर आल्याने मुक्ता संताप व्यक्त करते. आई माधवीच्या अपघाताने मुक्ता चिंतेत असते. आईला धडक मारणाऱ्यांना सोडायचे नाही, असे मुक्ता सागरला सांगते. सागरही पुढील कारवाईसाठी फोनाफोनी सुरू करतो आणि दोषींना सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त करतो. पण, आता माधवीला धडक मारणारा कार चालक कोण, हे समजणार का? सागर खरंच दोषीला शिक्षा करणार का? हे येत्या काही एपिसोडमध्ये समजेल.