Premachi Goshta Serial Update  :  'प्रेमाची गोष्ट'  (Premachi Goshta) मालिका आता रंजक वळणावर आली आहे.  माधवीच्या अपघातास कारणीभूत असलेल्या आदित्यबाबत मुक्ताला सगळं सत्य सागरला सांगायचे आहे. पण, तो सांगू शकत नाही. तर दुसरीकडे सागर-मुक्ताचा संसार मोडण्यासाठी सावनी आदित्यचा वापर करत आहे. आता, कार्तिकच्या इशाऱ्यावर स्वाती मुक्ताविरोधातील कटात सामिल होणार आहे. 


मुक्ताला आदित्यची काळजी...


आदित्यच्या तब्येतीवरून मुक्ता सागरला सांगते की, आता आदित्यसोबत मित्र म्हणून संवाद साधा. त्यामुळे तो का घाबरला आहे हे समजेल. वेळेतच या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत. त्यासाठी हवं तर तुम्ही आदित्यचा फोन आल्यानंतर तातडीने त्याला भेटायला जा, त्याच्यासोबत बोला, इकडची काळजी करू नका असे मुक्ता सांगते. तर, सागरच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली आहे. आदित्यसाठी मुक्ता किती काळजीने बोलते आणि मी त्यांच्यापासून सगळं लपवून ठेवतोय असे सागर मनातल्या मनात बोलतो. मुक्ताला सगळं सत्य सांगणारच असतो, पण मुक्ता तेवढ्यात झोपी गेलेली असते.


सागर सांगणार का मुक्ताला सत्य?


सकाळी सागर हिंमत करून मुक्ताला माधवीच्या अपघाताबाबत सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. पण, तेवढ्यात सागरला सावनीचा फोन येतो. आदित्यची तब्येत ठीक नसल्याचे सांगते. आदित्य तुझी आठवण काढतोय. तू संध्याकाळी घरी आलास तर त्याला बरे वाटेल. तो रात्रीपासून जेवला नाही. तू आलास तर किमान तो जेऊन घेईल असे सावनी सागरला म्हणते. 


मुक्ताला सगळं खरं सांगायच्या आधी आदित्यला सांभाळायला हवं. उद्या मुक्ताला सगळं सत्य सांगेल असे सागर मनात ठरवतो. मुक्ता कोणाचा फोन होता, असे विचारते. त्यावर सागर आदित्य जेवत नाही. मुक्ता आदित्यला भेटायला जा असे सांगते. 


स्वाती मुक्ताशी चांगलं बोलणार, पण....


तू दुसरीकडे आपल्या नवऱ्याला कशाला पाठवतेस असे स्वाती विचारते. सावनी चांगली नाही असे स्वाती सांगते. त्यावर मुक्ता मी आदित्यला भेटायला जायला सांगितले असे सांगते. स्वाती यावर म्हणते की, त्या घरात आदित्यसोबत सावनीदेखील आहे. त्यावर मुक्ता स्वातीला निश्चिंत करते. तू इतकी साधी भोळी कशी असे स्वाती मुक्ताला म्हणते. तेवढ्यात इंद्रा स्वातीला मुक्ता साधी भोळी नसल्याचे सांगते. जिने तुझ्या नवऱ्याला तुरुंगात डांबले तिची बाजू कशाला घेते असे इंद्रा स्वातीला म्हणते. स्वातीच्या मनात काहीतरी वेगळं सुरू असते. कार्तिकने दिलेल्या सुचनेनुसार स्वाती मुक्तासोबत चांगलं वागण्याचे नाटक करते. स्वाती आता कार्तिकच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी डाव आखते. 


इकडं सागर आजही सावनी-आदित्यकडे गेले असल्याबद्दल माधवी-पुरू नाराजी व्यक्त करतात. आदित्यला आठवण येत असेल तर त्याने इथे यायला हवं,  असे माधवी सांगते. तर, दुसरीकडे मिहिरदेखील सावनी विरोधात बोलतो. सावनीला मी चांगलेच ओळखतो असे सांगत  सागर विरोधात सावनीने माझा वापर केला असल्याचे सांगतो. आदित्यला भेटायचे असेल तर तो सागरला बाहेरही भेटू शकतो.