Marathi Serial Updates Star Pravah : छोट्या पडद्यावर सध्या आता नव्या मालिकांचा बोलबाला आहे. आता आणखी काही नवीन मालिका सुरू होणार आहेत. आता स्टार प्रवाहवर आणखी दोन नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी आता सुरू असलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  ‘येड लागलं प्रेमाचं’  (Yad Lagla Premacha) आणि ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ (Thoda Tujha Thoda Majha) या दोन मालिका सुरू  होणार आहेत. त्यासाठी आता सध्या सुरू असलेल्या मालिका निरोप घेणार आहेत. 


स्टार प्रवाह वाहिनीवरील 'पिंकीचा विजय असो' (Pinkicha Vijay Aso) आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यापैकी आता 'पिंकीचा विजय असो' ही मालिका ऑफएअर जाणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. या मालिकेचा शेवटचा महाएपिसोड 26 मे रोजी प्रसारीत होणार आहे. 'पिंकीचा विजय असो' मालिकेचा महाअंतिम एपिसोड हा 26 मे रोजी दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता प्रसारीत केला जाणार आहे.


महाअंतिम भागात काय असणार?


सोशल मीडियावर मालिकेच्या फॅन पेजवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बापूंनी रचलेल्या डावाला धोंडे-पाटील कुटुंब एकत्र सामोरे जाताना दिसत आहेत. बापूंनी हारामध्ये बॉम्ब ठेवला असतो. पिंकीकडे हा हार असतो. पिंकी तो हार घेऊन सगळ्यांना सावध करते. पण त्यावेळेस पिंकीची सासू म्हणजेच सुशीला तिला मिठ्ठी मारते आणि म्हणते, “मी सुद्धा तुझ्याबरोबर मरायला तयार आहे.” मग त्यानंतर संपूर्ण धोंडे-पाटील कुटुंब पिंकीला साथ देतात. आता हे धोंडे पाटील कुटुंब बापूंचा डाव त्यांच्यावरच उलटून लावणार का? मालिकेचा शेवट सुखद होणार का, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. 






 


'पिंकीचा विजय असो' या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजनकडून करण्यात आली. ही मालिका जानेवारी 2022 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील पिंकीची भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणेनी केली. मात्र, तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतर ही भूमिका आरती मोरेने दमदारपणे साकारली.


'स्टार प्रवाह'वर दोन नव्या मालिका... 


बिग बॉस फेम अभिनेता विशाल निकम, जय दुधाणे व अभिनेत्री पूजा बिरारी,अतिशा नाईक यांच्या मु्ख्य भूमिका असलेली  ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका 27 मे पासून रात्री 10 वाजता प्रसारीत होणार आहे. तर, अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवी मालिका 17 जून पासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.