Premachi Goshta Latest Episode :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आता सागर आणि मुक्ताने हर्षवर्धन-सावनीचा डाव हाणून पाडल्यावर हर्षवर्धनने आता आणखी एक कट रचला आहे. तर, दुसरीकडे आदित्यला सागरच्या जवळ आणण्यासाठी मुक्ताची धडपड सुरू झाली आहे. मुक्ताला यश मिळेल का, सागरला सावनी-हर्षवर्धनचा नवीन डाव लक्षात येईल का, अशा प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना  मिळणार आहे.


आजच्या एपिसोडमध्ये काय पाहणार?


सावनीला सागरच्या कंपनीची नवीन मॉडेल म्हणून मुक्ताची निवड झाल्याने हर्षवर्धन सावनीवर नाराज होतो. हर्षवर्धन सावनीला सुनावतो पण त्याच वेळी तो  सावनीला झालं गेलं विसरून जा म्हणतो. आणि त्याच वेळी तिला आपला नवा कट सांगतो. पॉवर ऑफ अॅटॉर्नीचे कागद सावनीकडे देतो आणि सागरच्या सह्या त्यावर घेण्यासाठी सावनीला सांगतो. आपल्याला सागर ऑफिसमध्येही प्रवेश करू देणार नाही असे सावनी सांगते. त्यावर हर्षवर्धन अजूनही तू कंपनीच्या संचालक मंडळावर असल्याचे सांगतो. हर्षवर्धनच्या या प्लॅनने सावनीला आनंद होतो. पॉवर ऑफ अॅटॉर्नीवर सागरने सह्या केल्यावर त्यांचे संपत्ती, बिझनेस सगळं हर्षवर्धनच्या नावावर होणार आहे. तर, सागरवर सूड उगवण्याची संधी असल्याचे सावनी सांगते. 


सावनी हर्षवर्धनने दिलेले  पॉवर ऑफ अॅटॉर्नीचे कागद हे सागरच्या केबिनमध्ये जाऊन एका फाईलमध्ये लपवते. त्याच वेळी सागर आपल्या केबिनमध्ये येतो. त्यावेळी सागर सावनीला इथे काय करतेस असा प्रश्न करते.त्यावेळी अजूनही कंपनीची  संचालक आहे हे हर्षवर्धनने सांगितलेले लक्षात येते आणि तेच उत्तर सागरला देते.


आदित्य जाणार माधवीकडे 


आदित्य शाळेच्या सुचनेनुसार कौन्सिलिंगसाठी मुक्ताची आई माधवीकडे येतो. मुक्ताने सागरच्या कपाटातून आदित्यचे काही जुने फोटो अल्बमधून काढले आहेत. हेच फोटो मुक्ता माधवीच्या घरी हॉलमध्ये ठेवते. समुपदेशनासाठी आदित्य आल्यानंतर माधवी त्याच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये जाते. तेव्हा आदित्य आपले बालपणीचे फोटो पाहतो. आपल्या बालपणीच्या आठवणीत रमतो. वडील सागरसोबतचे क्षण त्याला आठवतात.  


फोटो कुठून मिळाले हे आदित्य माधवीला विचारतो. त्यावेळी माधवी तुझ्या वडिलांकडून मिळाले असल्याचे सांगते. आदित्यच्या मनात विचारांचे द्वंद सुरू होते. त्याला नशेत असलेल्या सावनीचे बोलणे आठवते. त्यामुळे आई की बाबा अशा विचारात आदित्य पडतो. त्याच वेळी मुक्ताच्या आवाजात रेकॉर्ड केलेली आदित्य-सागरची गोष्ट माधवी आदित्यला ऐकवते. आदित्य या गोष्टीने भावूक होतो. त्याला वडील सागरसोबतच्या जुन्या आठवणी आठवतात. माधवी आदित्यला आपल्या परीने समजावते आणि कौन्सलिंगला उद्या पुन्हा ये असे म्हणते. तर, आदित्यवर फोटोंमुळे सकारात्मक झाला असेल का, या विचारात मुक्ता असते.