Gharoghari Matichya Chuli : छोट्या पडद्यावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी स्टार प्रवाहने सोमवारपासून ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) ही नवी मालिका सुरू केली आहे. ही नवी मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या वेळेवर ही मालिका सुरू करण्यात आली आहे.  यावर 'स्टार प्रवाह' वाहिनीने प्रेक्षकांना मालिकेचा पहिला एपिसोड कसा वाटला असा प्रश्न विचारला. त्यावर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला.


‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत 'स्टार प्रवाह'ने दमदार कलाकारांची फौज उतरवली आहे. त्यामुळे या मालिकेची मोठी चर्चा सुरू झाली होती.





या मालिकेसाठी 'आई कुठे काय करते' या मालिकेची वेळ बदलण्यात  आली. त्यानंतर पहिल्या एपिसोडनंतर काही प्रेक्षकांनी अपेक्षाभंग झाल्याचे म्हटले. एका प्रेक्षकाने म्हटले की, अतिशय भंपक आणि वाजवीपेक्षा अती बनावटी होता. खासकरून हृषीकेश रणदिवेने चिखलातून डुबणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रसंग तर कहर होता. एडीटिंग पूर्णच फसली हे स्पष्टच दिसून येत होत. थोडक्यात म्हणावं तर अपेक्षाभंग असा नाराजीचा सूर या प्रेक्षकाने लावला.




तर, एका प्रेक्षकाने 25 वर्षाच्या संसाराचं तुणतुणं वाजवणारी गेली आता आठ वर्षाच्या संसाराचं तुणतुणं वाजवणारी आलीये असे म्हटले. 




या मालिकेची एवढं चांगले प्रमोशन करूनही अपेक्षाभंग झाल्याचे एका प्रेक्षकाने म्हटले आहे. 




एका बाजूला टीका सुरू असताना दुसरीकडे प्रेक्षकांनी कौतुकदेखील केले आहे. या मालिकेचा पहिला एपिसोड चांगला वाटला असल्याचे एका प्रेक्षकाने म्हटले. रेश्माच्या आधीच्या मालिकेवरही प्रेम केलं तसंच प्रेम या मालिकेलाही देणार असल्याचे प्रेक्षकाने म्हटले.  




तर, दुसरीकडे एका प्रेक्षकाने ही मालिका ब्लॉकबस्टर असणार असल्याचे सांगितले. एका महिला प्रेक्षकाने काही लोक नाव ठेवतच असतात असे म्हटले. नाव ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन या प्रेक्षकाने मालिकेच्या टीमला केले. एका प्रेक्षकाने असेच कुटुंब हवे असे म्हटले. 


 




या मालिकेत तगडी स्टार कास्ट आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. आरोही सांबरे ही बालकलाकारही झळकणार आहे.  सविता प्रभुणे, सुमित पुसावळे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, भक्ती देसाई, सुनील गोडसे आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 


इतर संबंधित बातम्या :