Premachi Goshta Latest Episode :  धुळवडीच्या दिवशी सागर आणि आदित्यचे बोलणं ऐकून मुक्ता प्रचंड दुखावली आहे. मुक्ता नाराज झाल्याने दु:खात असलेला सागर नशेत धुंद आणि त्याची गुंड प्रवृत्तीच्या माणसांसोबत हाणामारी होते. यात सागर जखमी होतो. तर, दुसरीकडे सावनी पुन्हा एकदा मुक्ताच्या मनात संशयाचे भूत निर्माण करते.  'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील (Premachi Goshta) आजचा एपिसोड हा काहीसा गंभीर आणि मानवी स्वभावावर भाष्य करणारा असणार आहे. 


रात्रभर सागर नशेत घराबाहेर, हाणामारीत होणार जखमी


दुपारी घराबाहेर पडलेला सागर रात्री उशिरापर्यंत झाला तरी घरी येत नाही. त्यामुळे इंद्रा चिंतेत असते. लकी, बापू  सागरला फोन करत असतात. पण फोन लागत नाही. इंद्रा मुक्ताला सागरला बोल लावत असते.


मन दुखावल्याने मुक्ता सागरवर प्रचंड नाराज असते. विनवणी करूनही मुक्ता समजून घेत नसल्याने सागर रात्रभर रस्त्यावर दारू पिऊन धुंद होतो. सागर नशेत मोबाईलमध्ये मुक्ताचा फोटो पाहून तिच्याशी बोलत असतो. आपल्या मनातील सल सांगत असतो. त्याचे बोलणं ऐकून रस्त्यावर असलेले इतर दोघेजण मुक्ताबद्दल नको ते बोलत असतात. त्यांचे बोलणं ऐकून संतापलेला सागर रस्त्यावरील दोन व्यक्तींशी भांडतो. त्यांच्यात हाणामारी होते. 


मुक्ताच्या मनात सावनी निर्माण करणार संशयाचे भूत


सागर मुद्दाम असा वागतो असे मु्क्ताला वाटते. सागर आदित्यकडे गेला असेल का अशी शंका वाटल्याने मुक्ता सावनीच्या घरी जाते. रात्री घरी आलेल्या मुक्ताला पाहून सावनी संतापते. भांडणामुळे सागर घर सोडून गेलाय का असे सावनी मुक्ताला विचारते. सावनी आलेली संधी न सोडता मुक्ताच्या मनात सागरबद्दल आणखी गैरसमज पसरवते.


मुक्ताच्या मनात द्वंद


मिहीर मुक्ताला फोन करून सागर जखमी अवस्थेत सापडला असल्याचे सांगतो. मुक्ता तातडीने घरी जाते. सागरला डॉक्टरांकडे घेऊन गेलो असल्याचे मिहीर सांगतो. जखमी सागरला पाहून मुक्ताच्या मनात द्वंद सुरू असते. एका बाजूला सागरची विचारपूस करावी, कसं लागलं हे विचारावं असे मन सांगते. तर, दुसऱ्या बाजूला  सागरला विचारण्याची काही गरज नाही, त्याला माफ करण्याची आवश्यकता नाही असे मुक्ताचे दुसरं मन सांगते.