Premachi Goshta Latest Episode Highlights : आदित्यने पॉवर ऑफ अॅटॉर्नीचे पेपर्स फाडल्याचे समजल्याने हर्षवर्धन प्रचंड चिडतो. पुन्हा एकदा अपयश आल्याने सावनीदेखील आता नव्याने कट आखतेय. तर, दुसरीकडे मुक्ताचे मन दुखावल्याने सागरही अपराधीपणाच्या भावनेत आहे. आता मुक्ताचे मन वळवण्यासाठी सागर काय करणार, हर्षवर्धन आणि सावनी पुढे कोणता कट आखणार हे 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत दिसणार आहे. 


माधवीही सागरवर चिडणार


मुक्ताचे मन मोडल्याने नाराज झालेली माधवी सागरला सुनावते. मुक्ताने तुमच्या मार्गातील काटे काढले आणि तुम्ही तिचा विश्वासघात केला असल्याचे माधवी सांगते. माधवी मुक्ताने कोळी कुटुंबासाठी केलेल्या त्यागाची, कामाची उजळणी करून देते. तुम्ही तिच्यावर प्रेम केले नसते तरी चालले असते. पण, प्रेमाचे खोटं नाटक करायला नको हवे होते असे माधवी सागरला सांगते. सागर हात जोडून माधवीची माफी मागतो आणि चूक दुरुस्त करण्याची एक संधी मागतो.


डाव फसल्याने हर्षवर्धनची चिडचिड


सागरने सही केलेली कागदपत्रे आदित्यने फाडल्याने सावनी चिंतेत असते. हर्षवर्धनला सावनीला सागरने सही केलेले पेपर्स कुठे आहेत, असे विचारतो. त्यावर सावनी त्याला आदित्यने पेपर फाडले असल्याचे सावनी सांगते. यावर हर्षवर्धन चिडतो. सावनीवर मोठ्या आवाजाने ओरडतो. आदित्यने कागदपत्रे का फाडले असे विचारतो. यावर मलादेखील हा धक्का होता असे सावनी म्हणते. कौन्सिलिंगमुळे आदित्य बदलला असल्याचे  सावनी सांगते. मुक्तामुळेच सागरचे आयुष्य बदललं असल्याचे सावनी म्हणते. तर, हर्षवर्धन त्यावर सावनीला सुनावतो. आदित्य ही तुझी शेवटची आशा आहे. तो निघून गेल्यास मी तुझ्याशी लग्न करणार नसल्याची धमकी हर्षवर्धन देतो.


मुक्ता घरी परतली पण...


सागरच्या वक्तव्याने मुक्ता प्रचंड दुखावली आहे. सागरवर ती अजूनही नाराज असते. सागरकडून मुक्ताची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असतात. पण काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. घरी आलेल्या मुक्ताला सागरसोबतचे आनंदाचे क्षण आणि आदित्यला मुक्तावर आपले प्रेम नसल्याचे सांगत असल्याचे क्षण आठवतात. सागरच्या आयुष्यात आता फार काही स्थान नाही असे वाटल्याने मुक्ता आपली बॅग भरून ठेवते. किचनमध्ये जेवण करण्यास आलेल्या मुक्ताची सागर माफी मागतो. सागर गुडघ्यावर बसून मुक्ताची माफी मागतो. आपण नव्याने सुरुवात करू असे सागर मुक्ताला म्हणतो. पण, मुक्ता त्याच्याशी एक चकार शब्दही बोलत नाही. आता सागर काय करणार, मुक्ताची नाराजी कशी दूर करणार, हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांनी दिसेल.