TMKOC Asit Kumar Modi :   'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka ooltah Chashmah ) फेम जेनिफर मिस्त्रीने (Jenifer Mistry ) आसितकुमार मोदी ( Asit kumar Modi) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या केससंदर्भातला निकाल हा जेनिफरच्या बाजूने लागला. त्यानंतर आता अभिनेत्रीने शनिवारी मुंबईतील पवई पोलीस स्थानकाला भेट दिली. जेनिफरने नुकतच एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यामध्ये तिने पोलीस स्थानकात झाले यासंदर्भात भाष्य केलं आहे. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये मिसेस सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री यांनी असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या मदतीने कारवाई करण्यात आली. जेनिफर मिस्त्रीने यापूर्वी तिच्या बाजूने निकाल देऊनही आरोपीला शिक्षा न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.


जेनिफर मिस्त्री बंसीवालने काय म्हटलं?


जेनिफर मिस्त्रीने दावा केला आहे की, आता तारक मेहताचे निर्माते सांगत आहेत की, आसितकुमार मोदी यांच्याविरोधात कोणताही केस जिंकली वैगरे नाही. त्याचं म्हणणं आहे की,मी कोणत्यातरी फालतूच्या महिला ग्रुपकडे गेले आणि तिथे हे सगळं बरळले आहे. मग जर मी महिला ग्रुपकडे जाऊन हे सगळं केलं तर तुमचे इतके मोठे निर्माते तिथे सगळी कामं सोडून काय करत होते? सगळी कामं सोडून ते सुनावणीला का आले? असे सवाल यावेळी जेनिफरने उपस्थित केले आहेत. 


अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'आसित मोदी विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी तिने पोलीस अधिकाऱ्यांना 'अल्टीमेटम' दिला आहे आणि TMKOC निर्मात्यावर कारवाई न झाल्यास ती संपावर जाऊ शकते. ती म्हणाली, 'मी त्यांना अल्टिमेटम दिले की तुम्ही चार्जशीटचे काम लवकर केले नाही, तर मी काय करू, हेही मला माहीत नाही. पवई पोलिसांनी मला सांगितलं आहे की, सध्या राष्ट्रपती येणार असल्याने आम्ही त्या कामात आहोत. त्यामुळे जेव्हा द्रौपदी मुर्मूजी इथे येतील तेव्हा मी त्यांच्या समोरही आंदोलन करु शकते, त्यामुळे मला माहित नाही, की मी काय करु शकेन.' 






ही बातमी वाचा : 


TMKOC Asit Kumar Modi : लैंगिक छळ प्रकरणी 'तारक मेहता का...' अभिनेत्रीच्या बाजूने निकाल, निर्माते असित कुमार मोदींना ठोठावला दंड