Taarak Mehta ka Ulta Chashama Loksabha Election 2024 : तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta ka Ulta Chashama) ही हिंदीतील लोकप्रिय असलेली छोट्या पडद्यावरील मालिका आहे. गेली 16 वर्ष ही विनोदी मालिका सुरु असून दिवसागणिक trp चे नवे उच्चांक गाठत असून यातील सर्वच पात्र रसिकांना आवडतात. असे असले तरी ही मालिका अनेकदा विविध वादांनहीं रसिकरंजन करते. आता ही मालिका भारतीय जनता पार्टीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ चे बिगुल वाजण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेबाबत एक पोस्ट share करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. पक्षाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट share केली आहे.


भारतीय जनता पार्टीची पोस्ट काय आहे ? (BJP POST)


पक्षाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट share केली आहे. केलेल्या या पोस्टवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. या पोस्टमध्ये मालिकेतील पात्र खास अंदाजात दिसून येत आहेत. पात्राचा कल्पक वापर करत सरकारच्या योजनांचा गोकुळधाम वासीय कसा लाभ घेत आहेत याचे प्रमोशन केले आहे. या पोस्टरमध्ये आत्माराम भिडे पासून बाघा पर्यंत ते टप्पूसेनापर्यंत सर्व पात्र दिसून येत आहेत. यामध्ये महिलांसाठी शासन राबवीत असलेल्या योजनांची माहिती तसेच UPI चे फायदे सांगताना दिसून येत आहे.




असीत मोदींची प्रतिक्रिया (Asit Modi Reaction on BJP Post)


तारक मेहता का उलटा चष्मा या  मालिकेचे निर्माते यांनी BJP च्या सोशल मीडियावरील पोस्टर संदर्भात इंडिया टुडेशी बोलतांना आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. असीत मोदी म्हणाले, Bjp च्या या पोस्टबद्दल मला देखील नुकतेच समजले आहे. परंतू पोस्टर पाहिल्या नंतर त्यामध्ये कोणतेही असंविधानीक गोष्ट मला वाटत नाही. शिवाय यामध्ये प्रचाराचाही भाग मला दिसून येत नाही.     


इथे आहे तारका मेहताचा सेट


गेली 16 वर्ष अविहातपणे सुरु असलेल्या या मालिकेचे नुकतेच ३५०० एपिसोड पूर्ण झाले आहेत. या मालिकेचा आकर्षक आणि भव्य दिव्य सेट दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उभारण्यात आला आहे. हा सेट पाहण्यासाठी देशविदेशातील प्रेक्षक येत असतात.  


संबधित बातम्या 


Asit Modi Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील मोदींना अटक होणार? लैंगिक छळ प्रकरणी अभिनेत्री घेणार कोर्टात धाव