Premachi Goshta Latest Episode :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आपल्या नव्या प्रोडक्टसाठी मॉडेल म्हणून मुक्ता असावी यासाठी सागरचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे सागरने कोणती मॉडेल शोधली याचा शोध सावनी घेत असते. सागरच्या मॉडेलमुळे आपला डाव उधळला जाईल याची भिती सावनीला वाटते.


प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय पाहाल?


मुक्ताला मॉडेलिंगसाठी तयार करण्यासाठी सागर हा मुक्ताची आई माधवीला गळ घालतो. माझ्या प्रोडक्टसाठी एक मॉडेल हवीय असे सागर माधवीला सांगतो. मुक्ताला एका प्रोडक्टसाठी मॉडेलिंग करण्यासाठी तिला सांगावे, असे  माधवीला सांगतो. सागर माधवीला वेगवेगळ्या आयडिया देतो. मुक्ता आपले बोलणे लपून ऐकते हे लक्षात आल्यावर सागर थोडा घाबरतो. तर, दुसरीकडे मुक्ता सागरच्या मॉडेलिंगच्या ऑफरला नाकारते. 


मॉडेलिंगला मुक्ताने नकार दिल्याने  सागरची चिंता वाढली आहे. सावनीला फक्त मला खाली खेचायचे आहे, बिझनेस पाडायचा आहे. एकदा बिझनेसमध्ये नुकसान झाले मी खचणार आणि मुक्ता-सईपासून मला ती दूर करणार, हाच सावनीचा डाव आहे असे सागरच्या लक्षात येते.


सावनीची चिंता वाढली... 


सागरने निवडलेली मॉडेल कोण असणार याचा विचार करून सावनी चिंतेत पडली आहे. सागर आपला डाव हाणून पाडणार या भितीने तिची चिडचिड होत आहे. हर्षवर्धन सावनीला अतिआत्मविश्वासाने वावरू नको असे सांगतो. सागरच्या प्रोडक्टची मॉडेल मीच होणार त्यानंतर त्याच्या बिझनेसमध्ये मग घरात शिरणार असल्याचे सावनी सांगते. सागर आणि मुक्ताला मी उद्धवस्त करणार असल्याचे सावनी हर्षवर्धनला सांगते. 


पाहा व्हिडीओ :  Premachi Goshta | Latest Episode 166 | आज बघा | 8.00pm