Premachi Goshta Latest Episode :   'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सध्या सागर आणि मुक्तामध्ये प्रेम फुललं आहे. तर, दुसरीकडे सागरला नामोहराम करण्यासाठी हर्षवर्धन आणि सावनीने मोठा डाव टाकला आहे. सागरने ही सावनी-हर्षवर्धनला उत्तर देण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सागर यशस्वी होईल का, की त्याला सावनी-हर्षवर्धन समोर झुकावं लागेल, हे येत्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. 


आदित्यने वर्गात केली हाणामारी


आदित्य शाळेत बेशिस्तपणे वागतो. आदित्यने एका विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. मुख्याध्यापिका या सावनीला, आदित्य आणि मारहाण झालेल्या विद्यार्थ्याला बोलावून घेतात. आदित्यने मारहाण केली असल्याचे सावनीला सांगतात. सावनी आदित्यला त्याच्या वर्गमित्राची माफी मागण्यास सांगते. त्यावर आदित्य संतापतो. ही शाळा चुकीची असल्याचे आदित्य सांगतो. माझे वडील हर्षवर्धन नाही असे म्हणतो, त्यामुळे मी त्याला मारले. यापुढेही त्याने असे काही म्हटले तर त्याला मारेल असे आदित्य म्हणतो.त्यावर मुख्याध्यापिका सावनी आणि आदित्यला वॉर्निंग देतात.


मुख्याध्यापिका सावनीला शाळेतील समुदपदेशकाकडे जाण्याचा सल्ला देतात. त्यावर सावनी तयार होत नाही. पण, मुख्याध्यापिका सावनीला त्याची गरज असल्याचे सांगतात. अन्यथा, शाळेतून त्याला काढावे लागेल असा इशारा देतात. 


सागरला मिळणार का मॉडेल?


सावनीने सागरच्या कंपनीत मॉडेल म्हणून स्वत:ला सादर केले आहे. सागरने त्याला नकार दिला आहे. आता, सावनीला पर्याय म्हणून सागरला मॉडेल शोधायची आहे. सईसोबत मुक्ता खेळत असताना सागरला त्यात मॉडेल दिसते.  सागर मुक्ताला मॉडेलिंगसाठी विचारतो. मुक्ता ही बाब हसण्यावरी नेते आणि सागरला प्रेमाने झाडूने झोडपते. मात्र, सागरला हे  सगळं स्वप्नातच दिसते. 


सावनीचा सागरवर दबाव


ऑफिसमध्ये सागरला सावनी मॉडेलिंगच्या फोटोशूट बाबत विचारणा करते. सागर सावनीला त्यावरून सुनावतो आणि मला माझी मॉडेल मिळाली असे सांगतो. त्यावरून सावनीचा जळफळाट होतो. सावनी सागरला विचारणा करते. त्यावर सागर तिला तुझी आणि माझ्या मॉडेलची भेट होईल असे सांगतो.


आता, सागरच्या मनात मुक्ताला मॉडेल करण्याचा निश्चय आहे. मात्र, सागर मुक्ताला त्यासाठी राजी करणार का, सावनीच्या डावासमोर सागर हतबल होईल का, याची उत्तरे प्रेमाची गोष्टच्या एपिसोडमध्ये मिळणार आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :