Premachi Goshta Latest Episode : सागरने दिलेल्या सरप्राईजमुळे मुक्ता आणि गोखले कुटुंबीय आनंदात आहेत. तर, दुसरीकडे कोळी कुटुंबीयांमध्ये लकीमुळे आनंदाचे वातावरण दिसणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta Serial) मालिकेतील मागील काही भागांमध्ये कोळी कुटुंबात दिसणारे वाद, भांडणांऐवजी आनंद दिसणार आहे. सागर मुक्ताला आणखी एक सरप्राईज देण्याची तयारी करत आहे.


आजच्या एपिसोडमध्ये काय पाहता येणार?


'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या आजच्या भागात सागरने मुक्तासाठी केलेल्या पुरणपोळीचे कौतुक दिसणार आहे. मुक्ताच्या घरचे सागरचे कौतुक करतात. दरम्यान सई आजचा दिवस किती छान गेला असे सांगते. आज पप्पांनी तयार केलेली पुरणपोळी मिळाली आणि आज आदित्य दादा भेटला असे सांगते. सईमुळे घरातील वातावरणात थोडासा तणाव दिसून येतो. आदित्यचे अॅडमिशन झाले असल्याचे मुक्ता सांगते. सागर मुक्ताला आदित्यच्या आठवणी सांगतो. त्याच दरम्यान मुक्ता सागरला काही गोष्टींसाठी वेळ लागेल असे सांगत समजूत घालण्याचा प्रयत्न करते.


कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण


सागरचा धाकटा भाऊ लकी एमबीए पास होतो. त्याचा आनंद कोळी कुटुंबात दिसून येतो. एमबीए उत्तीर्ण झाल्याने लकी खूपच खुश असतो. मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी दीड लाख रुपये मागतो. सागरही त्याला आनंदाने हे पैसे देण्याचे कबूल करतो. घरात गोडधोड करण्याचे नियोजन होते. मुक्ताही एका पायावर तयार होते. 


मुक्ताला आणखी एक सरप्राईज देणार सागर 


सागर हा आता मुक्ताला आणखी एक सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तो प्लानिंगही करतो. सागर मुक्तासाठी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो. मुक्तासाठी लिहिलेली कविता सागर चैतन्यला वाचून दाखवतो. त्यावर चैतन्य तू कविता लिहिण्याचा प्रयत्न करू नको असे सांगतो. त्यावर मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी सागर विचार करतो. 


लकीने एमबीएने पास केल्याचा आनंद कोळी कुटुंब साजरा करणार आहेत. सागर घरातील सदस्यांना बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जायचे असल्याचे सांगतो. घरातील सगळे हॉटेलमध्ये जाण्यासाठी तयार होतात. त्याच दरम्यान आपल्या पोटात दुखत असल्याचे सागर सांगतो. सागर मुक्ताला थांबवून बाकीच्यांना हॉटेलमध्ये पाठवतो. सागर पोटात दुखत असल्याचे नाटक करत असून मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी ही धडपड करतो. आता सागर नेमकं काय सरप्राईज देणार हे आता लवकरच समजेल. 


पाहा व्हिडीओ :  सागर मुक्ताला देणार आणखी एक सरप्राईज; लकी झाला 'एमबीए', कोळी कुटुंबात आनंदाला उधाण