एक्स्प्लोर

‘दया, कुछ तो गडबड है’, कोणतंही कारण न सांगता सीआयडी बंद होणार

21 व्या वर्षात प्रवेश करत असलेला आणि सर्वात जास्त चाललेला सीआयडी हा क्राईम शो बंद होणार आहे. या मालिकेचा अखेरचा भाग शनिवार म्हणजे 27 ऑक्टोबरला सोनी टीव्हीवर दाखवला जाईल.

मुंबई : एसीपी प्रद्युम्न आता त्यांच्या खास शैलीत सहकाऱ्यांना ‘कुछ तो गडबड है’ म्हणू शकणार नाहीत, किंवा 'दया, दरवाजा तोड दो' यासारखा कोणताही आदेश देणार नाहीत. कारण, 21 व्या वर्षात प्रवेश करत असलेला आणि सर्वात जास्त चाललेला सीआयडी हा क्राईम शो बंद होणार आहे. या मालिकेचा अखेरचा भाग शनिवार म्हणजे 27 ऑक्टोबरला सोनी टीव्हीवर दाखवला जाईल. सोनी टीव्हीवर 1998 साली सुरु झालेला हा शो देशातील घराघरात लोकप्रिय झाला आहे. पण आता प्रेक्षकांसाठी बॅड न्यूज आहे. मालिकेत दयाची भूमिका साकारणारे दयानंद शेट्टी यांनी स्वतः याबाबतची माहिती एबीपी न्यूजला दिली आहे. दरम्यान, 20 वर्षात तब्बल 1550 एपिसोड पूर्ण करणाऱ्या ‘सीआयडी’विषयी सोनी टीव्हीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दयानंद शेट्टी यांनी 20 वर्षांपूर्वी या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सलग 20 वर्षे दयाची भूमिका साकारणाऱ्या दयानंद शेट्टींनी माहिती दिली, की पाच दिवसांपूर्वी शोचे निर्माता बी. पी. सिंह यांनी अनिश्चित काळासाठी शुटिंग थांबवत असल्याचा फतवा काढला. सेटवर असलेले शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि इतर सर्व कलाकारांना यामुळे धक्काच बसला. कुणालाही त्यावेळी विश्वास बसत नव्हता, असं दयानंद शेट्टींनी सांगितलं. सोनी टीव्हीकडून या शोविषयी दाखवला जाणारा सावत्र व्यवहारही वाढला होता, असं दयानंद शेट्टी यांनी सांगितलं. एपिसोड ठरलेल्या वेळेपेक्षा नेहमीच 10-15 मिनिटे उशिरा ऑन एअर जायचा, ज्यामुळे चॅनलची भूमिका स्पष्ट दिसत होती, असं ते म्हणाले. सीआयडी शोकडे सतत दुर्लक्ष करणं आणि इतर कारणांवरुन शोचे निर्माते बी. पी. सिंह आणि सोनी टीव्ही यांच्यातील तणावाचा परिणाम म्हणून हा शो आता बंद होत आहे. दरम्यान, शो बंद करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं. सुरुवातीपासून या शोमध्ये सहभागी असणारे आणि नंतर आलेल्या कलाकांरासाठी सीआयडीविषयी मनात खास जागा आहे. सर्व जण एका कुटुंबाप्रमाणे काम करत होते. यावेळी आम्हा सर्वांना अनाथ झाल्याची भावना आहे. आम्हा सर्वांना त्या चाहत्यांविषयी प्रचंड वाईट वाटतंय, जे 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही सीआयडीवर प्रेम करत होते, अशी प्रतिक्रिया दयानंद यांनी दिली. मे 2016 मध्ये सीआयडी शो जवळपास एक महिन्यासाठी ऑफ एअर गेला होता. तर यावर्षीही जुलै ते सप्टेंबर या दोन महिन्यांसाठी हा शो सोनी टीव्हीवरुन गायब होता. सीआयडी हा शो विविध विक्रमांसाठीही ओळखला जातो. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या शोची नोंद आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Embed widget