Sharayu Sonawane:  ‘पिंकीचा विजय असो’ (Pinky Cha Vijay Aso) फेम अभिनेत्री शरयू सोनवणेनं (Sharayu Sonawane) गुपचूप  साखरपुडा उरकला आहे.  शरयू सोनवणे आणि फिल्ममेकर जयंत लाडे (Jayant Lade) यांचा साखरपुडा झाला आहे. शरयूनं नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. 


शरयूनं नुकताच एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये फिल्ममेकर जयंत लाडे देखील दिसत आहे. या फोटोला शरयूनं कॅप्शन दिलं,'आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. Happy and engaged...!  गणपती बप्पा मोरया' शरयूनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेकांनी शरयू आणि  तिचा होणारा पती जयंत लाडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


शरयू आणि जयंत यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे,  सुख म्हणजे नक्की काय असतं  फेम अभिनेत्री गिरिजा प्रभू, रुपाली झनकर यांनी कमेंट करुन शरयू आणि जयंत  यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 






शरयू सोनवणेनं (Sharayu Sonawane) ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील पिंक ही प्रमुख भूमिका साकारली. पण काही कारणाने तिनं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. शरयूनं  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन तिच्या मालिका सोडण्याच्या निर्णयाबाबत चाहत्यांना सांगितलं होतं.


‘पिंकीचा विजय असो’ (Pinky Cha Vijay Aso) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत शरयू सोनवणेसोबत विजय आंदळकरने देखील प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेतील  युवराज ही भूमिका विजय आंदळकरने साकारली. तसेच या मालिकेमध्ये अधोक्षज कर्‍हाडे,रोहिणी नाईक,सुनील तावडे या कलाकारांनी देखील या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली. ‘पिंकीचा विजय असो’  ही मालिका  निमकी मुखिया या हिंदी टीव्ही मालिकेचा  रिमेक आहे असे म्हटलं जाते.


 


शरयू ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर  46.1K  फॉलोवर्स आहेत. शरयू सोनवणेच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Prajakta Koli Engagement : युट्यूबर प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; मोस्टलीसेन लवकरच अडकणार लग्नबंधनात