Kaun Banega Crorepati 15: 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) हा शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी होतात. नुकताच केबीसी कार्यक्रमामधील हॉट सिटवर बसलेल्या एका स्पर्धकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हा स्पर्धक भावूक झालेला दिसत आहे.
कौन बनेगा करोडपती 15 या कार्यक्रमाच्या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एका स्पर्धकाला 7 कोटी रुपयांसाठी 16 वा प्रश्न विचारतात. त्यानंतर स्पर्धक खूप भावूक होतो. यानंतर बिग बी स्पर्धकाला मिठी मारून सांत्वन करतात. पुढे प्रोमोमध्ये दिसते की तो स्पर्धक अमिताभ बच्चन यांना वाकून नमस्कार करतो. त्यानंतर प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, “यूं ही नहीं उमड़ आते हैं जज़्बात, वजह जरूर होती है. बताऊंगा आपको.” आता केबीसी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला हा स्पर्धक सात कोटी जिंकतो की नाही? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
पाहा प्रोमो:
केबीसी-15 चा पहिला करोडपती
पंजाबचा जसकरण हा केबीसीच्या 15 व्या सीझनचा पहिला करोडपती झाला आहे. मात्र, सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर जसकरणला देता आलं नाही. आता नुकत्याच व्हायरल झालेल्या केबीसी-15 च्या प्रोमोमधील स्पर्धक सात कोटी जिंकेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
केबीसी या शो बरोबरच अमिताभ बच्चन चित्रपटांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यांचे प्रोजेक्ट के, ‘सेक्शन 84’, ‘गणपथ - पार्ट 1’, ‘कल्कि 2898 एडी’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. बिग बींच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या: