एक्स्प्लोर

Phulala Sugandha Maticha Serial : स्टार प्रवाहच्या "फुलाला सुगंध मातीचा" मालिकेत होणार "या" सुप्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

Phulala Sugandha Maticha Serial : "फुलाला सुगंध मातीचा" मालिकेत लवकरच परमेश्वर स्वरुप स्वामीजी यांची एन्ट्री झाली आहे. ही स्वामीजींची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते गिरिश ओक साकारणार आहेत.

Phulala Sugandha Maticha Serial : स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कीर्ती आणि शुभम म्हणजेच समृद्धी केळकर आणि हर्षद अटकरीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेच्या सुरूवातीपासूनच मालिकेत वेगवेगळी वळणे येत आहेत. एका शहरी मुलीचे काही कारणास्तव तिचे इच्छा नसताना ग्रामीण भागातील मुलासोबत लग्न होते. अशा पद्धतीचे वळणे घेत मालिकेच्या कथानकाला सुरूवात झाली होती. आता पुन्हा एकदा 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. 

"फुलाला सुगंध मातीचा" मालिकेत लवकरच परमेश्वर स्वरुप स्वामीजी यांची एन्ट्री झाली आहे. ही स्वामीजींची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते गिरिश ओक साकारणार आहेत. गिरिश ओक पहिल्यांदाच अश्या पद्धतीची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. याआधी गिरिश ओक छोट्या पडद्यावरील "अग्गबाई सासूबाई" आणि "अग्गबाई सूनबाई" या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्या मालिकेत त्यांनी साकारलेल्या "अभिजीत" या पात्रावर प्रेक्षकांनी 
भरभरून प्रेम केले होते. 

स्वामीजींच्या भूमिकेविषयी गिरीश ओक म्हणाले, "मी याआधी अशा पद्धतीची पात्र रंगवलेली नाहीत. त्यामुळेच आता करताना मजा येत आहे. मला प्रत्यक्षात वेगळी असणारी पात्र साकारायला आवडतात. याआधी मी बरीच सात्वीक पात्र साकारलेली आहेत. त्यामुळे "फुलाला सुगंध मातीचा" मालिकेत स्वामीजी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. कोणतेही पात्र साकारताना त्याची लकब ही प्रेक्षकांच्या मनात कायम राहते. तसेच त्याला लोकप्रियतादेखील मिळते. मी हे पात्र साकारताना नवी लकब शोधून काढली आहे. प्रेक्षकांना हे पात्र आवडेल अशी आशा आहे. मी दिग्गज अभिनेते प्राण यांचा चाहता आहे. भूमिका रंगवताना ते त्या पात्राची प्रेक्षकांवर छाप सोडायचे. त्यामुळे नवी व्यक्तिरेखा साकारताना मी त्यांना डोळ्यासमोर ठेवतो. 

स्वामीजींच्या येण्याने कीर्तीसमोर मात्र नवं संकट उभं ठाकणार आहे. आता त्या संकटाचा सामना ती कशी करणार हे "फुलाला सुगंध मातीचा" मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Gautami Patil On Viral Video Controversy: 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
Bhargavi Chirmule Comeback On Star Pravah: कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?
कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?
Salman Khan Karan Johar: 'मी व्हर्जिन आहे', असं म्हणत सलमान खानने 'कॉफी विथ करण' गाजवलं; आता पुन्हा भाईजानची एन्ट्री, कोणतं सिक्रेट उघड करणार?
'मी व्हर्जिन आहे', असं म्हणत सलमान खानने 'कॉफी विथ करण' गाजवलं; आता पुन्हा भाईजानची एन्ट्री, कोणतं सिक्रेट उघड करणार?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Embed widget