एक्स्प्लोर

'आता सगळ्यांचा हिशोब होणार', पराग कान्हेरे पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात?

बिग बॉसची स्पर्धक, अभिनेत्री नेहा शितोळेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर पराग कान्हेरेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वातील वादग्रस्त आणि बहुचर्चित स्पर्धक शेफ पराग कान्हेरे पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. खुद्द परागने फेसबुक पोस्ट लिहून त्याविषयी संकेत दिले आहेत. शिवानीपाठोपाठ परागही बिग बॉसच्या घरात पुनर्प्रवेश करत असल्याची चर्चा आहे. 'येतोय मी. आता सगळ्यांचा हिशोब होणार. तू, तो आणि ती पण जाणार' अशा आशयाची पोस्ट परागने फेसबुकवर केली आहे. त्यामुळे पराग बिग बॉसच्या घरात येण्याची शक्यता बळावली आहे. अर्थात तो 'वाईल्ड कार्ड' म्हणून प्रवेश करणार, की केवळ काही दिवसांसाठी, हे काही दिवसांनीच समजू शकेल. बिग बॉसची स्पर्धक, अभिनेत्री नेहा शितोळेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर पराग कान्हेरेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धकांच्या एकमतानंतर 36 व्या दिवशी परागला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर येत्या आठवड्यात तो पुन्हा प्रवेश करेल. गेल्याच शनिवारी शिवानी सुर्वेने बिग बॉसच्या घरात पुन्हा पाऊल ठेवलं. शिवानी केवळ पाहुणी म्हणून बिग बॉसच्या घरात गेलेली असली, तरी त्याची कल्पना स्पर्धकांना नाही.
 'आता सगळ्यांचा हिशोब होणार', पराग कान्हेरे पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात?
शिवानीच्या एन्ट्रीनंतरही परागने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. बिग बॉसच्या निर्णयाविरुद्ध परागने नाराजी व्यक्त केली होती. घरात शिव्या देऊन भांडणं केली असती, तर मलाही एन्ट्री मिळाली असती, असं पराग म्हणाला होता. पराग कान्हेरे हा सुरुवातीपासूनच बिग बॉसमधील तगडा स्पर्धक मानला जात होता. वीणा, किशोरी, रुपाली आणि पराग यांचा 'केव्हीआरपी' ग्रुप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. कालांतराने वीणासोबतच्या मतभेदानंतर परागने ग्रुपला सोडचिठ्ठी दिली. रुपाली आणि पराग यांच्या मैत्रीचीही सर्वत्र चर्चा होती. परागच्या एक्झिटनंतर सोशल मीडियावर परागला मोठा पाठिंबा दर्शवण्यात आला होता. #BringBackParag या हॅशटॅगसह अनेकांनी सोशल मीडियावर समर्थन केलं होतं. आता अनेकांची मागणी ग्राह्य धरल्याचं चित्र आहे. बिग बॉसच्या घरात असताना परागचं शिवानी, वैशाली, नेहा यांच्यासोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यामुळे घरात पुन्हा एन्ट्री घेतल्यावर पराग नेमका कोणाचा हिशोब चुकता करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Samarth Marathi Movie: ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?
ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 956 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 956 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Embed widget