Pakistani Cooking Show Viral Video : छोट्या पडद्यावरील कूकिंग शोमध्ये सहभाग घेण्याची अनेकांनी इच्छा असते. काही लोक कूकिंग शोमध्ये सहभाग घेण्यासाठी मेहनत करत असतात. ज्यांची कूकिंग शोमध्ये सहभाग घेण्याची इच्छा असते ते लोक, विविध पदार्थ तयार करणे, चॉपिंग स्किल्स डेव्हलप करणे इत्यादी गोष्टींची प्रॅक्टिस करतात. पाकिस्तानमधील एका कूकिंग शोमधील भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कूकिंग शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा असणारी महिला चक्क विकत आणलेला पदार्थ त्या कार्यक्रमाच्या परीक्षकांना देते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी पाकिस्तानला ट्रोल केलेय. 


‘द किचन मास्टर’ या पाकिस्तानी  कूकिंग शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘मास्टरशेफ’ या कार्यक्रमासारखा ‘द किचन मास्टर’ हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात लोक त्यांनी तयार केलेले पदार्थ घेऊन येतात. हे पदार्थ कार्यक्रमाचे परीक्षक टेस्ट करतात. तो पदार्थ जर परीक्षकाला आवडला, तर तो व्यक्ती सिलेक्ट होतो. ‘द किचन मास्टर’  मधील एका एपिसोडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला चक्क विकत आणलेला पदार्थ परीक्षकांना देते, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


‘द किचन मास्टर’ कार्यक्रमाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला डब्यात बिर्याणी घेऊन आलेली दिसत आहे. या बिर्याणीबाबत ती म्हणते, 'मला असं सांगण्यात आलं होतं की, एक पदार्थ आणाचा आहे. त्यामुळे मी आमच्या एरियामध्ये मिळणारी सर्वात चांगली बिर्याणी घेऊ आले. मी वेगवेगळे पदार्थ बनवू शकते पण मला पदार्थ बनवून आणायचा आहे, हे सांगण्यात आलं नाही.' त्या महिलेचं बोलणं ऐकल्यानंतर कार्यक्रमाचे परीक्षक भडकतात. त्यामधील एक परीक्षक त्या महिलेला बाहेर जाण्यास सांगतात. पण ती महिला बाहेर जाण्यास नकार देते. ‘द किचन मास्टर’ कार्यक्रमाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल.


पाहा व्हिडीओ:






हा व्हायरल व्हिडीओ नंदिता नायर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला असून अनेकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Chiranjeevi - Nagarjuna : अभिनेते चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी घेतली अनुराग ठाकूर यांची भेट; 'या' विषयांवर केली चर्चा