Chiranjeevi - Nagarjuna : अभिनेते चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी घेतली अनुराग ठाकूर यांची भेट; 'या' विषयांवर केली चर्चा

Anurag Thakur meets Chiranjeevi, Nagaarjun : हैद्राबाद येथे दौऱ्यावर असताना अनुराग ठाकूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजावी आणि नागार्जुन यांची भेट घेतली.

Continues below advertisement

Chiranjeevi-Nagarjuna Anuraj Thakur Pics : भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ( BJP MP Anurag Thakur) हे काही दिवसांपूर्वी हैद्राबाद (Hyderabad) येथे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान  अनुराग ठाकूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजावी (Chiranjeevi) आणि नागार्जुन (Nagarjuna) यांची भेट घेतली. चिरंजावी यांनी अनुराग ठाकूर आणि नागार्जुन यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले. 

Continues below advertisement

सोमवारी (27 फेब्रुवारी) अनुराग ठाकुर यांनी चिरंजीवी आणि नागार्जुन यांची भेट घेतली. अनुराग ठाकूर हे हैद्राबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी चिरंजीवी यांनी अनुराग ठाकूर यांना त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले.  चिरंजीवी यांच्या विशेष आमंत्रणानंतर अनुराग ठाकूर हे चिरंजीवी यांच्या घरी पोहोचले. चिरंजीवी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अनुराग ठाकूर यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये अनुराग ठाकूर, चिरंजीवी आणि नागार्जुन दिसत आहेत.  चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी अनुराग ठाकूर यांना शाल आणि गणेश मूर्ती भेट दिली. 

अभिनेते चिरंजीवी यांची पोस्ट

चिरंजीवी यांनी नागार्जुन आणि अनुराग ठाकूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'हैद्राबाद दौऱ्यादरम्यान माझ्या घरी येण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मी अनुराग ठाकूर यांचे आभार मानतो. भारतीय चित्रपटसृष्टीबाबत आणि या इंडस्ट्रीची होणारी प्रगती या विषयांबद्दल माझा भाऊ नागार्जुन आणि अनुराग ठाकूर यांच्यासोबत चर्चा केली. 'चिरंजीवी यांनी शेअर केलेल्या या पोस्टला अनेकांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. 

चिरंजीवी आणि नागार्जुन यांचे चित्रपट

काही महिन्यापूर्वी चिरंजीवी यांचे 'गॉडफादर' आणि 'वॉलटेर वीरय्या' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. तर नागार्जुन यांनी ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये काम केले.  चिरंजीवी आणि नागार्जुन  यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबत देशभरात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

March 2023 Movies Release : मार्च महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बॉक्स ऑफिसवर रणबीर-अजय येणार आमने-सामने

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola