एक्स्प्लोर
'तुला पाहते रे'मध्ये राजनंदिनीबाबत मोठं रहस्य उलगडणार!
आता कथेत एवढा मोठा ट्विस्ट कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. त्याचंच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मुंबई : 'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत सरंजामे आणि इशाच्या प्रेमाची गोष्ट आता युद्धात बदलणार आहे. जी इशा विक्रांतवर जिवापाड प्रेम करत होती तिच इशा आता विक्रांतला कायमची अद्दल घडवणार आहे. आता कथेत एवढा मोठा ट्विस्ट कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. त्याचंच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. गोष्टीतल्या सगळ्यात मोठ्या रहस्याचा उलगडा तुमच्यासमोर करणार आहोत.
तर घडलंय असं की राजनंदिनीचा खून झालाय आणि तो केलाय साक्षात गजा अर्थात विक्रांत सरंजामेने. विक्रांतने सगळी संपत्ती मिळवण्यासाठी जो गेम खेळलाय, त्या गेमच्या नादात त्याने राजनंदिनीचाच गेम केला आहे. हे खुद्द इशानेच सांगितलं आहे.
एवढंच नाही तर आणखी एका मोठा गौप्यस्फोट आता करणार आहोत आणि तो म्हणजे इशा हिच राजनंदिनी आहे. पुन्हा एकदा सांगतोय इशा हिच राजनंदिनी आहे. ज्या राजनंदिनीचा विक्रांत सरंजामेनी खून केला त्याचा बदला घेण्यासाठी ती परत आली आहे.
आता यातली गंमत अशी आहे राजनंदिनीचा खून झाल्यामुळे शिल्पा तुळसकर यांचा रोल संपला आहे. म्हणजे ज्या राजनंदिनीचा चेहरा मालिकेच्या पहिल्या भागापासून टायटल मोंटाजमध्ये दिसत होता, तिचा अख्खा ट्रॅक केवळ 15 दिवसात संपवला आहे. शिल्पा तुळसकरांनी अवघ्या 12 दिवस शूटिंग केलंय ज्यासाठी त्यांनी कित्येक महिने वाट पाहिली आहे. आता हे स्क्रिप्टमध्येच असं होतं की आणखी काही? आम्ही विचारलं मालिकेच्या दिग्दर्शकांनाच. ते म्हणाले की, शिल्पा तुळसकर यांचा ट्रॅक एवढाच होता.
तर हे सगळं रामायण येत्या शनिवारी आणि रविवारच्या महाएपिसोडमधून आपल्यासमोर येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement