एक्स्प्लोर

नटसम्राट पुन्हा रंगभूमीवर अवतरणार, गणपतराव कोण साकारणार?

आता पुन्हा एकदा नटसम्राट हे नाटक रंगमंचावर येणार आहे. विशेष बात अशी, की हॅम्लेट, अलबत्या गलबत्या या नाटकांच्या यशानंतर झी मराठी हे नाटक मंचावर आणणार आहे.

मुंबई: वि.वा.शिरवाडकर लिखित नटसम्राट हे नाटक कमालीचं गाजलं. गणपतराव बेलवलकरांची भूमिका साकराणं हे खायचं काम नव्हतं. म्हणूनच भल्याभल्या कलाकारांना नटसम्राट साकारण्याची भुरळ पडली. आजही ती कायम आहे. आजवर यशवंत दत्त, सतीश दुभाषी, दत्ता भट, श्रीराम लागू, उपेंद्र दाते आदींनी हा गणपतराव साकारला. या नाट्यकृतीचा मोह झाल्यानंतर महेश मांजरेकर यांनीही या नाटकाला चंदेरी पडद्यावर आणलं. त्यावेळी नाना पाटेकर यांनी ही भूमिका साकारली. आता पुन्हा एकदा हे नाटक रंगमंचावर येणार आहे. विशेष बात अशी, की हॅम्लेट, अलबत्या गलबत्या या नाटकांच्या यशानंतर झी मराठी हे नाटक मंचावर आणणार आहे. सध्या या नाटकाची तालीम सुरु असून रंगभूमीवर गणपतरावांची भूमिका कोण करणार याकडे रसिकांचं लक्ष लागलं आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विशेष बातमीनुसार ही भूमिका वठवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे अभिनेते मोहन जोशी यांच्याकडे. विष्णूदास भावे पदक मिळालेले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी या भूमिकेला न्याय देतील अशी खात्री रंगकर्मींना वाटते. तर कावेरी यांची भूमिका साकारणार आहेत, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली असून, नोव्हेंबरच्या 4 तारखेला हे नाटक रंगभूमीवर आणण्याचा मानस निर्मात्यांचा आहे. झी मराठीने यापूर्वी अष्टविनायक, जिगीषा, अद्वैत या नाट्यसंस्थांना हाताशी धरुन हॅम्लेट, अलबत्या गलबत्या ही नाटकं दिली. रसिकांनी ती तुफान उचलून धरली. आता अरण्यक हे नाटकही नव्याने रंगभूमीवर येतं आहे. त्यात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकासह नटसम्राट हे नाटकही रंगभूमीवर आल्यानंतर हा समूह एकूण चार नाटकं नाट्यसृष्टीत चालवेल.

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Embed widget