एक्स्प्लोर

'मोनोपॉली' नोट देऊन रिक्षावाल्याकडून अभिनेत्रीची फसवणूक

मुंबई : खोट्या नोटा देऊन फसवणूक करण्याचा प्रकार अनेक वेळा ऐकायला मिळतो. या नोटा बहुतांश वेळा पाचशे किंवा एक हजार रुपयांच्या असतात. मात्र मुंबईतील एका अभिनेत्रीची चक्क 100 रुपयांची खोटी नोट देऊन फसवणूक करण्यात आली आहे. रिक्षावाल्याने 'मोनोपॉली' खेळातली नोट देऊन मेघा चक्रवर्तीला गंडवलं. हुबेहुब बनवण्यात आलेल्या नोटांमुळे काहीवेळा ग्राहकांची फसगत होते. मात्र टीव्ही अभिनेत्री मेघा चक्रवर्तीला 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' असं लिहिलेली शंभर रुपयांची नोट रिक्षावाल्याने दिली. रात्री एक वाजता मेघाने ही नोट घेतली. अंधारात हा प्रकार लक्षात न आल्याने घरी गेल्यावर तिला आपली फसवणूक झाल्याचं समजलं. मूळ कोलकात्याच्या असलेल्या मेघाने हा प्रकार फेसबुकवर शेअर केला आहे. मात्र तिच्या मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांनी मेघावरच तोंडसुख घेतलं आहे. 'तुझीच चूक आहे, अशी कशी मूर्ख बनलीस' अशा कमेंट्स करत मेघालाच वेड्यात काढलं गेलं आहे. आरबीआय गव्हर्नर ऐवजी सांताक्लॉजची सही असलेली नोट मेघाच्या हातात देण्यात आली. शंभर रुपये कूपन असं लिहिलेल्या या खेळातल्या नोटा वांद्रा पूर्वेकडच्या स्कायवॉकवर मोठ्या प्रमाणात आढळल्याचंही सांगितलं जात आहे. मेघाने शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. 10 हजारांहून जास्त लाईक्स आणि दोन हजारांपेक्षा जास्त वेळा फेसबुक शेअर असलेल्या फोटोतून मात्र मेघाचीच खिल्ली उडवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pooja birari Yetech ata mi Nandayla: पूजा बिरारी अन् उषा नाडकर्णी एकाच मालिकेत; ‘येतेच आता मी नांदायला’ची चर्चा, सून अन् आजेसासूची अनोखी गोष्ट
पूजा बिरारी अन् उषा नाडकर्णी एकाच मालिकेत; ‘येतेच आता मी नांदायला’ची चर्चा, सून अन् आजेसासूची अनोखी गोष्ट
Tarini TV Serial Tweest Promo: 'बाईला सामान्य समजण्याची चूकच पुरुषाला नडते...'; डॉ. कामतनंच तारिणीच्या आईला संपवलं? 'तारिणी'मध्ये थरारक ट्विस्ट, Promo
'बाईला सामान्य समजण्याची चूकच पुरुषाला नडते...'; डॉ. कामतनंच तारिणीच्या आईला संपवलं? 'तारिणी'मध्ये थरारक ट्विस्ट, Promo
Pralhad Kudtarkar Becomes Father: 'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर झाला बाबा; घरी चिमुकल्या राजाचं आगमन, VIDEO व्हायरल
'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर झाला बाबा; घरी चिमुकल्या राजाचं आगमन, VIDEO व्हायरल
Shivani Naik on Irregular Periods: 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'
'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget