Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा (Bigg Boss Marathi Season 5) पहिला आठवडा हा भांडणाने चांगलाच गाजला. निक्कीने (Nikki Tamboli) घरातल्या प्रत्येकासोबत घातलेल्या राड्याची बरीच चर्चा झाली आणि भाऊच्या धक्क्यावर त्याचा योग्य निकालही लागली. त्यातच निक्कीने वर्षा उसगांवकर यांच्यासोबत केलेल्या वागणुकीवर मात्र महाराष्ट्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पण या सगळ्यात एका मराठी अभिनेत्रीने निक्कीला फुल्ल सपोर्ट दिल्याचं पाहायला मिळत आहे. 


अभिनेत्री मिरा जग्गनाथ ही देखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.  बिग बॉसचा नवा सिझन सुरु झाला आहे. पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर अनेकांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यातच नक्कीच्या वागणुकीवरही रितेशने तिला चांगलेच खडेबोल सुनावले आणि माफी देखील मागायला लावली. पण मिराच्या पोस्टवरचीही सध्या बरीच चर्चा सुरु झाली आहे. 


मिराची पोस्ट नेमकी काय?


मिराने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, इथे कुणीही मान अपमानाची अपेक्षा ठेवू नये. बिग बॉसच्या घरात कुणीही मोठा कलाकार किंवा छोटा कलाकार नसतो आणि तुमचं वय घरी ठेवून या.                                  


           


रितेश भाऊचा निक्कीला 'दे धक्का'


बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला 29 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या सीझनच्या पहिल्याच दिवसापासून घरामध्ये राडा पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळी हीने पहिल्याच दिवसापासून इतर स्पर्धकांसोबत वाद घालायला सुरुवात केली. निक्कीने पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकर यांच्याशी भांडण केलं, त्यानंतर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरसोबत वाद घातला. त्यानंतर निक्की रॅपर आर्या जाधवला जाऊन भिडली. यानंतर निक्की तांबोळीवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. आज रितेश भाऊंच्या धक्क्यावर निक्कीची वाट लागणार असं प्रोमोमधून दिसत आहे. यावर नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi : एक नंबर! अख्खा महाराष्ट्र याचीच वाट पाहत होता, आता सगळ्यांचा माज उतरणार; रितेश भाऊचा निक्कीला 'दे धक्का'