एक्स्प्लोर

Mi Punha Yein : 'मी पुन्हा येईन' प्रेक्षकांच्या भेटीला; असत्य घटनांवर आधारित वेबसीरिज

Mi Punha Yein : 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Mi Punha Yein : महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडली आहे. राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक पद्घतीने भाष्य करणारी ‘मी पुन्हा येईन' (Mi Punha Yein) ही वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी’वर प्रदर्शित झाली आहे. 

'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा अरविंद जगताप यांनी सांभाळली आहे. या सीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे असे दमदार कलाकार आहेत. 

सध्या 'मी पुन्हा येईन'चे तीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यात सत्तेसाठी पक्ष वरिष्ठांना विनवण्या, सत्तानाट्य, मंत्रीपदासाठी राजकारण्यांची फसवणूक, आमदारांची पळवापळवी हे सर्व विनोदी शैलीत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, "सध्याच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नसून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे. राजकारणामागील गोष्टी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " विनोदीशैलीत निर्मित केलेली ही वेबसीरिज श्रोत्यांना खिळवून ठेवणारी आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, हे वेबसीरिज राहिल्यावर कळेलच. प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली आहे. 

'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरीज पूर्ण करेल"

संबंधित बातम्या

Mi Punha yein : राजकारणात काही खरं नाही...'मी पुन्हा येईन' वेबसीरिज संदर्भात अरविंद जगताप यांनी केली खास पोस्ट शेअर

Mi Punha Yein : 'मी पुन्हा येईन' वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज; भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi Awards: झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा नामांकन सोहळा दणक्यात पार! मराठी कलाकारांचा जल्लोष; धमाल अन् मनोरंजन
Soham Bandekar on Wife Pooja Birari: 'हिच्याकडे मी नोकरी करायला तयार...'; पूजा बिरारीचा बँक बॅलेन्स बघून पती सोहम बांदेकर असं का म्हणाला?
'हिच्याकडे मी नोकरी करायला तयार...'; पूजा बिरारीचा बँक बॅलेन्स बघून पती सोहम बांदेकर असं का म्हणाला?
Ruchita Jamdar On Jahnavi Killekar: 'बिग बॉसचा पाचवा सीझन पाहिलाय...', रुचिता जामदारकडून जान्हवी किल्लेकरच्या जुन्या वक्तव्याचा समाचार, सणसणीत टोला लगावून म्हणाली...
'बिग बॉसचा पाचवा सीझन पाहिलाय...', रुचिता जामदारकडून जान्हवी किल्लेकरच्या जुन्या वक्तव्याचा समाचार, सणसणीत टोला लगावून म्हणाली...
Rohan gujar Twins: मराठी अभिनेत्याच्या घरी जुळ्या मुलांचं आगमन; 8 वर्षांनी बाबा झाला, लेकरांची पहिली झलक शेअर करत म्हणाला...
मराठी अभिनेत्याच्या घरी जुळ्या मुलांचं आगमन; 8 वर्षांनी बाबा झाला, लेकरांची पहिली झलक शेअर करत म्हणाला...

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget