Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: नृत्यातून सादर होणार कहाणी फुलवा खामकरची; ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’च्या मंचावर खास परफॉर्मन्स
‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) या कार्यक्रमामध्ये फुलवा खामकरचा प्रवास नृत्यातून मांडण्यात येणार आहे.
![Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: नृत्यातून सादर होणार कहाणी फुलवा खामकरची; ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’च्या मंचावर खास परफॉर्मन्स Mi Honar Superstar Jallosh Juniorscha dance performance dedicated to phulwa khamkar see promo Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: नृत्यातून सादर होणार कहाणी फुलवा खामकरची; ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’च्या मंचावर खास परफॉर्मन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/05/618d174352b6365eb3a04f00145658391683285985787259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) या कार्यक्रमामध्ये बच्चे कंपनी हे विविध परफॉर्मन्स सादर करतात. त्यांचे हे परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात. सध्या या कार्यक्रमामधील एका परफॉर्म्सचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमामधील स्पर्धक हे कोरिओग्राफर फुलवा खामकरसाठी खास परफॉर्मन्स करताना दिसत आहेत.
‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमामध्ये आस्था, चेरी आणि वेदा यांना फुलवा खामकरसाठी खास परफॉर्मन्स केला. आस्था, चेरी आणि वेदा यांचा हा परफॉर्मन्स पाहून फुलवा खामकरला अश्रू अनावर झाले. प्रोमोमध्ये दिसत आहे की, फुलवा खामकर ही आस्था, चेरी आणि वेदा यांचा परफॉर्मन्स पाहून भावनिक झालेली दिसत आहे. आता ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमाचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळत आहे. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, कोरिओग्राफर फुलवा खामकर (Phulwa Khamkar), वैभव घुगे यांचं (Vaibhav Ghuge) मार्गदर्शन आणि सुपरजज अंकुश चौधरीचा (Ankush Choudhary) सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या दोस्तांचे असेच नवनवे परफॉर्मन्स पहाण्यासाठी न चुकता पाहा मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा.
मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाच्या गेल्या एपिसोडमध्ये खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून अंकुश चौधरी याचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास प्रेक्षकांसमोर मांडला होता. प्रथमचा हा परफॉर्मन्स पाहून अंकुश चौधरी (Ankush Choudhary) भावूक झाला. प्रथमने सादर केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने अंकुशच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)