Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' हे गाण्याचं नवं पर्व लवकरच सुरू होत आहे. 5 ते 14 या वयोगटातील छोट्या उस्तादांना या अनोख्या कार्यक्रमात झळकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे असणार आहे. 


सचिन पिळगावकर याआधी परिक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत. मात्र गाण्याच्या कार्यक्रमाचे ते पहिल्यांदाच परिक्षण करणार आहेत. तर वैशाली सामंत तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमाविषयी सचिन पिळगावकर म्हणाले,"मी आजवर पार्श्वगायक म्हणून 200 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. मी बऱ्याच गाण्यांचं संगीत दिग्दर्शनही केलं आहे. मात्र मी सिंगिंग शोचे पहिल्यांदाच परिक्षण करणार आहे. लहान मुलांसोबत त्यांच्या जगात हरवण्याची संधी हा कार्यक्रम नक्की देईल अशी भावना आहे."


4 डिसेंबरपासून रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे हे त्रिकुट या कार्यक्रमाचे परिक्षण करणार आहेत. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून या कार्यक्रमासाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. तेव्हा बच्चेकंपनीच्या सुरांची ही अनोखी मैफल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


'दिल तो बच्चा है जी' म्हणत सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदेने परिधान केला शाळेचा गणवेश


मिथाली राजची कारकीर्द उलगडणार; Taapsee Pannu च्या 'शाबास मिथू' सिनेमाची तारीख ठरली


Luckdown : 'एका लग्नाची धमाल गोष्ट', 28 जानेवारीपासून महाराष्ट्रात होणार 'लकडाऊन'ची चर्चा


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुबोध भावे आणि पूजा सावंतची एन्ट्री


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha