Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही खास पाहुणे भेटायला जात असतात. सदस्यांसोबत ते धम्माल मस्ती करतात, काही गेम्स खेळतात, त्यांना टास्क देतात आणि सदस्यांच्या घरातील खेळाबद्दल काय वाटते आहे, त्यांचा आवडता सदस्य कोण हेदेखील सांगतात. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुबोध भावे आणि पूजा सावंत हे खास पाहुणे जाणार आहेत. 


सुबोध भावे आणि पूजा सावंतच्या एन्ट्रीमुळे स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. दोघेही सदस्यांना भन्नाट टास्क देणार आहेत. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांनी एकत्र एका मालिकेत काम केले होते. त्यामुळे त्याला घरामध्ये बघितल्यावर गायत्रीचा आनंद गगनात मावेनासा होणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात टीम A मधील सदस्यांमध्ये दुरावा वाढतच चालला आहे. मग तो टास्क असो वा घरातील वावर. गायत्रीसोबत जय, मीरा, उत्कर्षने अबोला कायम ठेवला आहे. हे तिघे एकमेकांशी बोलताना दिसतात खरे पण, फक्त वाद घालताना आणि एकमेकांना टोमणे मारताना.





बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुबोध भावे आणि पूजा सावंत तर जाणार आहेतच पण अजून दोन सदस्य देखील जाणार आहेत. बिग बॉस मराठीच्या मागील दोन पर्वातील सदस्य म्हणजेच माधव देवचक्के आणि सुशांत शेलार घरातील स्पर्धकांना भेटायला जाणार आहेत. घरातील सदस्यांना माधव आणि सुशांत तिरंदाजीचा टास्क देणार आहेत. या टास्कमध्ये एक सदस्य दुसर्‍या सदस्याच्या निशाण्यावर असणार आहे. 


माधव आणि सुशांतने सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली, गप्पा मारल्या आणि सदस्यांना टास्कदेखील दिले. मीराच्या मते गायत्री आणि जयच्या मते विकास ट्रॉफीपासून लांब आहेत, असं त्यांना वाटत आहे. त्यांनी त्याची कारणे देखील सांगितली.


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : कंगनाच्या कारवर हल्ला, पंजाबमध्ये जमावाने घेरले


Ankita Lokhande - Vicky Jain Wedding : आली समीप लग्नघटीका, अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात


'जयंती' महिन्याच्या शेवटपर्यंत गाजली, बॉलिवूड चित्रपटांपेक्षा प्रेक्षकांची मराठी चित्रपटांना पसंती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha