Taapsee Pannu : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या 'शाबास मिथू' सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमा चर्चेत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. मिताली राज एक यशस्वी महिला क्रिकेटपटूंपैकी एक मानली जाते. मितालीच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. 


बहुप्रतिक्षित  'शाबास मिथू' सिनेमा 4 फेब्रुवारी 2022 रोजी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी तापसी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तापसीचा नुकताच 'रश्मी रॉकेट' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता तापसी लवकरच 'शाबास मिथू' या आगामी सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचे एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.





मिताली राजचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यासाठी निर्मात्यांनी युनायटेड किंगडमसह देशांतर्गत सिनेमातील भाग चित्रित केले आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून खेळाडूंचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित रणवीर सिंहचा '83' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान शाहिद कपूरच्या जर्सी सिनेमाला सोशल मीडियावर चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.


संबंधित बातम्या


Neha Dhupia : नेहा धुपियाच्या मुलाची पहिली झलक, बाळासोबतचा हृदयस्पर्शी फोटो केला शेअर


Kangana Ranaut : कंगनाच्या कारवर हल्ला, पंजाबमध्ये जमावाने घेरले


Ankita Lokhande - Vicky Jain Wedding : आली समीप लग्नघटीका, अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha