Luckdown : लॉकडाऊन नंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपट गृहांकडे वळत असून हिंदी चित्रपटाच्या सोबतच मराठी चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनाला तत्पर आहेत. एक एक करून सगळेच आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत आहेत. मराठीतील 'जयंती', 'झिम्मा', 'पांडू' सिनेमे सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहेत. तर दुसरीकडे आगामी मराठी सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखादेखील जाहीर होत आहेत. दरम्यान 'लकडाऊन' सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 


अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेला 'लकडाऊन' सिनेमा येत्या 28 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची कथा ही सिनेमाच्या नावातच लपलेली आहे. लॉकडाऊन दरम्यान ठरलेल्या एका लग्नाची ही धमाल गोष्ट आहे.
'लकडाऊन' या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची  मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा ज्या प्रमाणे लॉकडाऊन मध्ये घडली तसाच हा चित्रपट लॉकडाऊन मध्ये चित्रित केला आहे. 


चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अंकुश आणि प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकलेले दिसत असले तरी त्यासाठी त्यांना करायला लागणारी धावपळ म्हणजे या चित्रपटाचं कथानक. चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश आणि प्राजक्ता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. सिनेमाचे लेखन रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली आहेत. 


संबंधित बातम्या


'जयंती' महिन्याच्या शेवटपर्यंत गाजली, बॉलिवूड चित्रपटांपेक्षा प्रेक्षकांची मराठी चित्रपटांना पसंती


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुबोध भावे आणि पूजा सावंतची एन्ट्री


Ankita Lokhande - Vicky Jain Wedding : आली समीप लग्नघटीका, अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात


Kangana Ranaut : कंगनाच्या कारवर हल्ला, पंजाबमध्ये जमावाने घेरले


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha