Marathi Serials Vat Purnima Special Episode : मराठी मालिकाविश्वात (Marathi Serial) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आपली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. कथानकातही नाविण्य आणण्याचा प्रयत्न होत आहे. आता मराठी मालिकांमध्ये वटपौर्णिमा (Vat Purnima) विशेष भाग रंगणार आहे.
मराठी मालिकांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मालिकांमध्ये पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. आपल्या मालिकेच्या कथांमध्ये नवीन मनोरंजक वळण देऊन प्रेक्षकांचे मन जिंकत असतात. जून महिना म्हटलं की येते वटपौर्णिमा. लग्न झालेल्या स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचं हे व्रत करतात. आता मराठी मालिकांमध्येही मालिकांमध्ये ‘वटपौर्णिमा विशेष’ भाग दाखवले जाणार आहेत.
'या' मालिकांचे रंगणार 'वटपौर्णिमा विशेष' भाग (Marathi Serials Vat Purnima Special Episode)
'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector),'नवा गडी नवा राज्य' (Nava Gadi Nava Rajya), 'लवंगी मिरची' (Lavangi Mirchi) आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकांचे 'वटपौर्णिमा विशेष' भाग पाहायला मिळणार आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत वटपोर्णिमेच्या दिवशी कलेक्टर अपर्णा सुरेश माने आपले कर्तव्य व्रत पूर्ण करत अर्जुनला भ्रष्टचाराच्या आरोपाखाली अटक करणार आहे. दुसरीकडे 'नवा गडी नव राज्य' मध्ये राघव वर येणार आहे. एक नवीन संकट, आनंदीचे वटपोर्णिमेचे व्रत वाचवू शकेल का राघवला या संकटातून?
'लवंगी मिरची' मालिकेत राधाक्काला वट पोर्णिमेचे व्रत ठेवता येईल का? की यामिनी यातही काही अडचणी आणेल? तर वटपौर्णिमा विशेष आठवड्यात 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' अद्वैतच्या दीर्घायुष्यासाठी नेत्रा घेणार आहे एक महत्वपूर्ण निर्णय. वटपौर्णिमा विशेष आठवड्याची मालिकाप्रेमींना आता उत्सुकता आहे.
मराठी मालिकांमधला वटपौर्णिमा विशेष' आठवडा सोमवार ते शनिवार पार पडणार आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका प्रेक्षक संध्याकाळी सात वाजता प्रेक्षक पाहू शकतात. तर 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका रात्री नऊ वाजता, 'लवंगी मिरची' रात्री 10 वाजता आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका रात्री 10.30 वाजता प्रेक्षक पाहू शकतात.
संबंधित बातम्या