Anupam Mittal Father Death: शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचे परीक्षक आणि प्रसिद्ध  उद्योजक अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांचे वडील गोपाल कृष्ण मित्तल (Gopal Krishna Mittal ) यांचे निधन झाले आहे. अनुपम हे त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करतात. सोमवारी (29 मे) अनुपम मित्तल यांची पत्नी आंचल कुमार यांनी इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता.  या फोटोला अनुपम यांनी रिपोस्ट करुन लिहिलं,  “Shine on Us Daddy.” 


 शार्क टँक इंडियाच्या एका एपिसोडमध्ये, अनुपम मित्तल यांनी त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रवासात कशी प्रेरणा दिली, याबाबत सांगितले होते. एक आठवण सांगताना अनुपम म्हणाले होते की, त्यांचे वडील हातमाग व्यवसायात होते. लहानपणी अनुपम हे वडिलांचे बोट धरून त्यांचे काम बघत होते. तेव्हाच त्यांच्या मनात उद्योजक होण्याबाबत विचार येत होते. 



अनुपम मित्तल यांनी गेल्या वर्षी त्यांच्या वडिलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये गोपाल मित्तल हे केक कट करताना दिसत आहे. या फोटोला अनुपम यांनी कॅप्शन दिलं,  'फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा... तुमची मोठ्या मन हे प्रेरणादायी आहे. आशा आहे की  एक दिवस मी तुमच्या सारखा होईल.'






शार्क टँक इंडिया या कार्यक्रमामुळे अनुपम मित्तल यांना विशेष लोकप्रियता मिळाली. अनुपम मित्तल प्रसिद्ध उद्योजक असून ते पीपल ग्रुपचे मालक आणि Shaadi.com या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत.  काही दिवसांपूर्वी अनुपम मित्तल  यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे ते चर्चेत होते.याबात अनुपम यांनी सोशल मीडियावर माहिती दिली होती. 






शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमात अनुपम मित्तल यांच्यासोबतच ‘बोट’ कंपनीचे को सह-संस्थापक  अमन गुप्ता, ‘लेंस्कार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, 'शुगर कॉस्मेटिक्स' कंपनीच्या सह-संस्थापक विनीता सिंह आणि 'एमक्योर फार्मास्युटिकल्स'च्या कार्यकारी संचालक नमिता थापरही हे परीक्षकाची भूमिका साकरतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या


'शार्क टँक इंडिया 2'मधून रिकाम्या हातांनी परतले, पण त्यानंतर...; एका रात्रीत सावरला बुडणारा व्यवसाय