Marathi Serial Updates Tharal Tar Mag!  : स्टार प्रवाह वाहिनीवर 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag!)  ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात. मागील काही दिवसांपासून मालिकेत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आता एक मोठा ट्वीस्ट मालिकेत येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतने वाट पहातोय तो भावनिक क्षण 8 जुलैच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पूर्णा आजी सायलीला नातसून म्हणून स्वीकारणार आहे. 


छोट्या पडद्यावर मागील अनेक वर्षांपासून स्टार प्रवाहवरील मालिका या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग!' ही मालिका सातत्याने आघाडीवर आहे. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.  सायली-अर्जुनच्या प्रेमाचा बेरंग करण्याचा प्रयत्न  अनेकदा करण्यात आला. सुभेदारांची सून प्रियाने अनेकदा असे प्रयत्न केले. त्यावर मात करत  सायली-अर्जुनचे प्रेम खुलू लागले. समोर आलेल्या अनेक संकटांना हे दोघेही सामोरे गेले. सायलीने आपल्या स्वभावावर लोकांच्या मनात घर करण्यास सुरुवात केली. आता, या मालिकेत मोठा ट्वीस्ट येत आहे. खरंतर सायलीने आपल्या प्रेमळ आणि समंजस स्वभावाने सर्वांचच मन जिंकले आहे. सायलीच्या निरागस स्वभावाच्या प्रेमात अर्जुनही पडला आहे.पूर्णा आजीचं मतपरिवर्तन व्हायला मात्र खूप वाट पाहावी लागली. अनेक प्रसंगांमध्ये पूर्णा आजीला सायलीमध्ये तिच्या लाडक्या प्रतिमाचा भास व्हायचा. मात्र तरीही तिने सायलीला नातसूनेचा दर्जा कधीच दिला नव्हता. 


आता मात्र पूर्णा आजीला आपल्या चुकीची जाणीव झाली असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे.संपूर्ण कुटुंबासमोर सायलीची माफी मागून पूर्णा आजी घराची जबाबदारी सायलीवर सोपवणार आहे. मालिकेतील हा महत्त्वाचा क्षण 8 जुलै रोजीच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे. 


मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं तिसरं पर्व भेटीसाठी सज्ज 


स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या दोन्ही पर्वांना उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या लोकप्रिय कार्यक्रमाचं तिसरं पर्वही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वातही  सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), लोकप्रिय गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) आणि तरुणाईचा लाडका गायक आदर्श शिंदे (Aadarsha Shinde) हे परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  या कार्यक्रमातून अनेक महाराष्ट्रातील अनेक छोटो गायक प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वाचा पहिला भाग हा आषाढी एकादशीच्या दिवशी सुरु होणार आहे.