Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Pillu Bachelor : 'पिल्लू बॅचलर' सिनेमाचा ट्रेलर आऊट! सायली संजीव, पाठकबाई अन् पार्थ भालेराव मुख्य भूमिकेत


Pillu Bachelor Trailer Out : वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाच्या फोडणीतून 'पिल्लू बॅचलर' (Pillu Bachelor) हा सिनेमा प्रेक्षकांची पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, हा सिनेमा 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Songya Official Trailer: "एका लढवय्या मुलीची कहाणी"; सोंग्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


Songya Official Trailer: अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. ऋतुजानं अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ऋतुजाचा सोंग्या (Songya) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tharla Tar Mag : सायली-अर्जुनची केमिस्ट्री, टीआरपीच्या शर्यतीत पहिला क्रमांक अन् बरचं काही..; जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग' मालिकेला एक वर्ष पूर्ण


Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay karte) सारख्या लोकप्रिय मालिकेला या मालिकेने मागे टाकलं आहे. आता या बहुचर्चित मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Limca Book of Records : नाट्य क्षेत्रातील नवा विक्रमवीर आकाश भडसावळे! अभिनेत्याने केला रंगकर्मींची मान अभिमानाने उंचावणारा विश्वविक्रम


Akash Bhadsavle Limca Book of World Record : मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अतूट नातं आहे. महाराष्ट्राला नाटकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. नाटक गंभीर असो, विनोदी असो, सस्पेन्स असो किंवा संगीत नाटक; दर्दी रसिक मराठी नाटकांना आवर्जून उपस्थित राहतात. नाट्य क्षेत्रामध्ये यापूर्वी काही विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. अशातच आता आकाश भडसावळे (Akash Bhadsavle) नाट्य क्षेत्रातला नवा विक्रमवीर ठरला आहे. त्याने केलेल्या रेकॉर्डची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये (Limca Book Of World Record) करण्यात आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Shivani Surve And Ajinkya Nanaware: मालिकेच्या सेटवर झाली भेट, मैत्रीचं रुपांतर झालं प्रेमात; अशी अजिंक्य आणि शिवानीची लव्ह स्टोरी


Shivani Surve And Ajinkya Nanaware: अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) ही सध्या तिच्या झिम्मा-2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. झिम्मा-2  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात शिवानीनं मनाली ही भूमिका साकारली आहे. शिवानीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. नुकतीच शिवानीनं सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये शिवानीनं अभिनेता अजिंक्य ननावरे(Ajinkya Nanaware) आणि तिच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा